मास्कमुक्त महाराष्ट्र होणार का?; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात…

मुंबई | कोरोना आकडेवारीत दिवसेंदिवस घट होताना पाहायला मिळत आहे. देशाला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. परिणामी आता परस्थिती पुर्वपदावार आणण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत.

कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासोबतच राज्यात रूग्णांवर उपचार करण्यासाठी सरकार योग्य उपाय करत आहे. अशातच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

राज्यात आता कोरोनाची तिसरी लाट ओसरत चालली आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव सध्यातरी फारसा दिसत नाहीये.

कोरोना रूग्णसंख्येत घट होत असल्यानं राज्य सरकार निर्बंध मागं घेण्यावर विचार करत आहे. सध्या काही क्षेत्रातील निर्बंध काही प्रमाणात मागं घेण्यात येत आहेत.

लाट ओसरत असली तरी तुर्तास मास्क वापरावाच लागणार आहे. मास्कमुक्त महाराष्ट्र होणार असं सध्या सर्वत्र बोलंल जात असताना टोपे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

एका लाटेत दरदिवशी कोरोना रूग्णसंख्या 50 हजारांवर गेली होती आता रूग्णसंख्या 750-800 पर्यंत आली आहे. असं असलं तरी मास्क सक्ती ही लागू राहाणार असल्याचं टोपे म्हणाले आहेत.

मार्चअखेरपर्यंत कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात येतील, असंही टोपे म्हणाले आहेत. राज्यात सध्या लसीकरणाचं प्रमाण वाढलेलं आहे.

दरम्यान, राज्यात सध्या मुंबई-पुणे शहरांमध्ये देखील कोरोना आकडेवारीत कमालीची घट पाहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “मी जर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असतो तर युक्रेन आणि रशिया युद्ध झालंच नसतं”

 मराठी भाषादिनी राज ठाकरेंची मोठी घोषणा; घेतला ‘हा’ निर्णय

तुमची लाडकी Wagon R येतेय नव्या रूपात; जाणून घ्या फिचर्स 

मोठी बातमी! दिशा सालियन बदनामी प्रकरणी राणे पिता-पुत्रांना झटका 

युक्रेनने तो प्रस्ताव फेटाळला; संतापलेल्या रशियानं केली मोठी घोषणा