वॉशिंग्टन | अमेरिकासुद्धा कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडला आहे. महासत्ता असलेल्या या देशात 24 तासांत 100 जणांचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे.
अमेरिकेत कोरोनानं मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 389वर गेली आहे. जॉन हॉपकिन्स विश्वविद्यालयानं मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारी जारी केली आहे. आतापर्यंत सर्वाधिक न्यूयॉर्कमध्ये 114, वॉशिंग्टन मध्ये 94 आणि कॅलिफोर्नियात 28 जणांचा मृत्यू झाला असून हे तिन्ही प्रांत कोरोनानं प्रभावित झालेले आहेत.
अमेरिकेत जवळपास 30 हजार लोक या विषाणूनं संक्रमित झाले आहेत. विशेष म्हणजे संक्रमित होणाऱ्यांमध्ये अमेरिकेच्या सिनेटर रँड पॉल यांचाही समावेश आहे. रविवारी केलेल्या चाचणीत रँड पॉल पॉझिटिव्ह आढळले आहेत.
दरम्यान, पॉल यांच्या ऑफिसकडून ही माहिती देण्यात आली आहे. पॉल हे कोविड 19 विषाणूनं संक्रमित झाले आहेत. पण त्यांची प्रकृती ठीक आहे. रँड पॉल हे कोरोनानं संक्रमित झालेले अमेरिकेतले पहिले सिनेटर आहेत.
महत्वाच्या बातम्या –
-“संकट किती भयंकर आहे ह्याची कल्पना काही लोकांना नाही, आता संचार बंदी लागू करा”
-मुंबईत कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; मृतांचा आकडा 3 वर
-कोरोनासोबतची आपली लढाई संपली नसून आता खरी सुरुवात झाली आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी
-महाराष्ट्र लॉकडाऊन म्हणजे नेमकं काय काय होणार??
-“सार्वजनिक ठिकाणी एकमेकांपासून अंतर ठेवणं हाच कोरोना नियंत्रणातील यशाचा मंत्र आहे”