फोन टॅपिंग प्रकरणी अत्यंत धक्कादायक माहिती समोर!

मुंबई | फोन टॅपिंग प्रकरणी अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. कुलाबा पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये रश्मी शुक्ला यांच्या विभागात काम करणाऱ्या एसीपींचा जबाब नोंदवण्यात आला आहे. यानंतर एकच खळबळ उडालीये.

बेकायदा असल्याने नकार देऊनही शुक्ला यांनी फोन टॅपिंग करायला लावल्याचं या एसीपीने आपल्या जबाबात म्हटलं आहे.

संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे बेकायदा फोन टॅपिंग केल्याप्रकरणी राज्य गुप्तवार्ता पथकाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांच्या विरोधात कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय राऊत यांच्यासाठी एस. रहाटे आणि खडसेंसाठी खडासने या नावाचा वापर करून हे दोघंही समाजविघातक कृत्य करत असल्याचं शुक्ला यांनी भासवलं.

फोन टॅपिंग करताना हे रहाटे किंवा खडासने नसून, राऊत आणि खडसे असल्याचं काही अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. संबंधित सहायक आयुक्तांनी ही बाब शुक्लांना सांगितली पण त्यांनी हे बरोबर असल्याचं म्हटलं.

शुक्ला यांनी भारतीय टेलिग्राफिक अ‍ॅक्ट कलम 419- अ चा दाखल देत आपणास अधिकार असल्याचं दाखवून अधिकाऱ्यांना फोन टॅपिंग करायला सांगितल्याची माहिती समोर आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“…तर राज ठाकरेंची सभा उधळून लावणार” 

‘…तर कुणी मानसिक रोगी’; जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला 

मोठी बातमी! शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्यावर बलात्काराचा आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ 

“तुम्हाला कळत नसेल तर अजित पवारांना विचारा…”; चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंना टोला 

“…मग केंद्र सरकार काय फक्त घंटा वाजवायला बसलंय का?”