…म्हणून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काँग्रेसच्या 7 खासदारांना केलं निलंबित!

नवी दिल्ली |   आज लोकसभेमध्ये दिल्ली हिंसाचाराच्या मुद्द्यावरून मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान लोकसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या 7 खासदारांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

सभागृहात चुकीचे वर्तन केल्याप्रकरणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काँग्रेसच्या 7 खासदारांचं निलंबन केलं आहे. गौरव गोगोई, टी.ए.न प्रथापन, डीन कुरियाकोस, आर. उन्नीथान, मनिकाम टागोर, बॅन्नी बेहनन, गुरजीत सिंह अजुलिया या 7 खासदारांवर बिर्ला यांनी निलंबनाची कारवाई केली.

दुसरीकडे गेली महिनाभर राजधानी दिल्लीमध्ये मोठा हिंसाचार पाहायला मिळाला. दिल्लीच्या अनेक भागात दंगल उसळलेली पाहायला मिळाली. जाळपोळीच्या अनेक घटना घडत होत्या. साहजिकच या सगळ्यांमुळे दिल्लीचं वातावरण खराब झालं होतं.

दिल्लीची दंगल केंद्रातील सत्ताधारी भाजपने भडकावल्याचा आरोप काँग्रेससहित राष्ट्रवादीने केला आहे. दिल्ली पोलिसांनी काहीच हालचाल न केल्याने दिल्लीचं वातावरण भडकायला मदत झाल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-इतिहासात पहिल्यांदाच भारतीय महिला क्रिकेट संघ पोहोचला अंतिम फेरीत!

-तक्रार मागे घे नाही तर…; विद्या चव्हाणांनी सुनेला धमकावलं

-उद्धवजी, अयोध्येला जाता त्याप्रमाणे शेतकऱ्यांकडेही जा- बच्चू कडू

-‘हा केतकर रोज कांबळेच्या दिग्दर्शनाखाली काम करतो याचा मला अभिमान’; सुजयवर टीकास्त्र

-‘साने-मंजुळे’ हे कॉम्बिनेशन तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे; शशांकचा सुजय डहाकेवर निशाणा