‘मी मोदींना मारु शकतो’ म्हणणाऱ्या नाना पटोलेंच्या अडचणीत वाढ!

मुंबई | मी मोदींना मारु शकतो आणि शिव्या देऊ शकतो, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं होतं. त्याबाबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होता. भाजप नेत्यांनी यावर आक्रमक भूमिका घेतली होती.

यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी नाना पटोले यांच्यावर घणाघाती टीका केली होती.

राज्यात ठिकठिकाणी नाना पटोले यांच्याविरूद्ध आंदोलनं देखील झाली होती. त्यानंतर आता नानांच्या अटचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांनी मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास गेले होते.

त्यानंतर डीसीपी कार्यालय आणि पोलिस आयुक्तांकडे नाना पटोले यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली होती. त्यानंतर आता तेजिंदरसिंग तिवाना यांनी थेट न्यायालयात धाव घेतली आहे.

न्यायालयाने भोईवाडा पोलीस स्टेशनला याचिकेत नोंदवलेल्या सर्व कलमांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर अहवाल सादर करण्यात यावेत, असे आदेश न्यायालयाने दिलेत. त्यामुळे आता नाना पटोले यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पंतप्रधान हे देशातील महत्त्वाचं पद आहे. घटनात्मक पद आहे. पंतप्रधानांचा अपमान करणं हा देशातील नागरिकांचा अपमान आहे, असं  तेजिंदरसिंग तिवाना यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

विराटचं लक नाय गड्या! आयपीएलमध्ये चौथ्यांदा ‘गोल्डन डक’ झाला; पाहा व्हिडीओ

“उद्धव ठाकरेंच्या मागं साडेसाती लागली, त्यांनी हनुमान चालिसा म्हणावी नाहीतर…”

 चेहऱ्यावर स्मित हास्य अन् डोळ्यात पाणी; हवाई सुंदरीचा भावनिक व्हिडीओ व्हायरल

“दादागिरी केली असती तर 35 वर्षे राजकारणात टिकलो नसतो”

स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नवजात मुलाचं निधन!