भारत मजबूत स्थितीत;विराट, मयांकची अर्धशतकी खेळी

किंग्जटन :  भारत आणि वेस्ट इंडिज दुसऱ्या कसोटी सामन्यात विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. विराट कोहलीच्या आणि मयांकच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने 5 बाद 264 धावांची मजल मारली. भारताचे सलामीवीर लोकेश राहुल व मयांक यांनी सावध सुरुवात केल्यानंतर होल्डरने विंडीजला पहिले यश मिळवून दिले.

जेसन होल्डरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेला आपला निर्णय सार्थ ठरवत सूरूवातीला भारतीय फलंदाजीला खिंडार पाडले. भारताची एकवेळ 2 बाद 46 अशी स्थितीत विराट आणि मयांकने सामन्याची सुत्रे आपल्या हातात घेतली.

विराटने कोहलीने सर्वाधिक 76 धावा केल्या तर मयांकने 127 चेंडूत 55 धावांची खेळी केली. मागील सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या अजिंक्य रहाणेला या सामन्यात केवळ 24 धावा करता आल्या.आता हनुमा विहारी 42 धावा आणि रिषभ पंत 27 धावांवर खेळत आहेत.  

वेस्ट इंडिजकडून कर्णधार जेसन होल्डरने सर्वाधिक तीन गडी बाद केले. त्याने लोकेश राहुल, मयांक अग्रवाल आणि विराट कोहलीला माघारी पाठवले. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर वेस्ट इंडिजच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत.

143 किलो वजनी आणि 6 फुट 5 इंच उंचीच्या रहकीम कॉर्नवाल याने कसोटी सामन्यात पदार्पण केले. तर जहमार हॅमिल्टन यालाही संघात स्थान देण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या-