रोहित-राहुलची धमाल! न्यूझीलंडचा पराभव करत टी-ट्वेंटी मालिका खिशात

रांची | भारत आणि न्यूझीलंड (IndVSNz) यांच्यात टी-ट्वेंटी सामन्यांची मालिका सध्या सुरू आहे. पहिला सामना जिंकल्यानंतर आता आजचा सामना जिंकून भारताने (India beat New Zealand to win the series) ही मालिका खिशात टाकली आहे.

आजच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 7 गडी राखून पराभव केला आहे. न्यूझीलंडने दिलेल्या 154 धावांंचं आव्हान पार करताना भारतीय सलामीवीरांनी धडाकेबाज सुरूवात करून दिली.

कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार के एल राहुलने सुरूवातीला सावध खेळी केली आणि नंतर आक्रमक फटकेबाजी करत भारताला सामना केवळ 18 व्या षटकात जिंकून दिला आहे.

रोहित राहुलने शतकीय भागेदारी केली. पहिल्या विकेटसाठी दोन्ही खेळाडूंनी 117 धावांची भागेदारी केली आहे. 14 व्या षटकात न्यूझीलंडला रोहित राहुलची भागेदारी तोडण्यात यश आलं.

त्यानंतर रिषभ पंत आणि व्यंकटेश अय्यरने उरलं सुरलं काम पुर्ण केलं आणि भारताने सामना अखेर खिश्यात घातला. त्याचबरोबर भारताने ही टी-ट्वेंटी मालिका देखील जिंकली आहे.

सर्वप्रथम नाणेफेक जिंकून भारताने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भारतीय गोलंदाजांनी कर्णधार रोहित शर्माचा हा निर्णय पुर्णपणे फेल ठरवला. पहिल्याच षटकात सलामीवीर माॅर्टिन गप्टील आणि डॅरिल मिशेल यांनी धुवाधार फटकेबाजी सुरू केली.

मैदानावरील औसचा परिणाम सुरूवातीपासून भारतीय गोलंदाजीत दिसत होता. माॅर्टिन गप्टीलने आक्रमक खेळी सुरू केली. पाॅवरप्लेमध्ये त्याने चौकार आणि षटकाराचा पाऊस पाडला.

मात्र, दिपक चहरने मागील सामन्याप्रमाणे या सामन्यात देखील माॅर्टिन गप्टीलला तंबुत परतवलं. माॅर्टिन गप्टीलने केवळ 15 चेंडूत 31 धावा केल्या. त्यात त्याने 2 चौकार आणि 3 षटकार खेचले.

चांगली सुरूवात होऊन देखील न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. अखेर 20 षटकात न्यूझीलंडला केवळ 153 धावा करता आल्या आहेत.

दरम्यान, या सामन्यात भारताकडून प्रदार्पण करणाऱ्या हर्षल पटेलने चांगली गोलंदाजी केली. तर रोहित शर्मा आणि के एल राहुलची सलामी खेळी महत्त्वाची ठरली.

महत्त्वाच्या बातम्या – 

“मी बहुजन असल्यानं राष्ट्रवादीकडून मला संपवण्याचा प्रयत्न होतोय”

स्फोटक सुरूवातीनंतर न्यूझीलंडचा डाव ढेपाळला; भारतासमोर 154 धावांचं आव्हान

‘मला वाटलं रिषभ धोनीसारखा खेळेल पण…’; ‘या’ दिग्गज खेळाडूने व्यक्त केली नाराजी

 कोरोनातून बरे झालेल्यांना ‘या’ आजाराचा धोका; आली धक्कादायक माहिती समोर

“मला खूप आनंद झालाय, पण हे विरोधी पक्षांचं यश नाही”