ट्रम्प यांनी धमकी दिल्याबरोबर भारताने हायड्रोक्सीक्लोरिक्वीनवरची निर्यातबंदी उठवली

नवी दिल्ली | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधाच्या पुरवठयावरुन भारताला धमकी दिली होती. त्यानंतर आता भारताने 24 औषधांवरची निर्यातबंदी उठवली आहे. अमेरिकेच्या दबावानंतर ही निर्यातबंदी उठवल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

कोरोना व्हायरसच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर मागच्या महिन्यात काही औषधांच्या निर्यातीवर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र अमेरिकेच्या धमकीनंतर भारताने आता ही निर्यातबंदी तातडीने उठवली आहे.

भारताच्या क्षमतांवर अवलंबून असणार्‍या सर्व शेजारी देशांना योग्य प्रमाणात पॅरासिटामॉल आणि हायड्रोक्सीक्लोरोक्विनचा परवाना देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेल्या काही राष्ट्रांना आम्ही ही आवश्यक औषधे पुरवत आहोत, असं सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, अमेरिकेत कोरोनाने हाहाकार माजवला आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेला सध्या भारताची गरज आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना हायड्रॉक्सीक्लोरोक्विन गोळ्या पुरवण्याची विनंती केली होती. जर गोळ्या पुरवल्या नाहीत तर याचे भारताला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा धमकी वजा इशारा त्यांनी दिला होता.

महत्वाच्या बातम्या-

-14 एप्रिलला लॉकडाऊन संपणार का?; आरोग्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

-… तर गंभीर परिणाम भोगावे लागतील; डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी

-“14 एप्रिलला घरावर रोषणाई करा, दिवे लावा, मात्र आंबेडकर जयंती घरीच साजरी करा”

-देशात 4 हजारांवर कोरोनाचे रुग्ण तर 109 मृत्यू, 25 हजार तबलिगी क्वारंटाईन

-‘आम्हाला पैशांची समस्या नाही तर…’, केजरीवालांनी दिलं गौतम गंभीरला उत्तर