आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहिर ;हार्दिकचे पुनरागमन

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील विजयी संघात फक्त एकमेव बदल करताना अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याचे पुनरागमन झाले आहे. तसेच धोनीने या मालिकेतुनसुद्धा माघार घेतली आहे. 

दोन महिन्यांची विश्रांती घेणारा धोनी सध्या अमेरिकेत कुटुंबीयांसोबत पर्यटनाला गेला आहे. याआधी त्याने 15 दिवस सैन्यात घालवले होते. दुखापतीतून सावरलेला हार्दिक भारतीय संघात परतला आहे. 

वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला खेळाचा ताण व्यवस्थापन कार्यक्रमानुसार संघात स्थान देण्यात आलेले नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेत भारताने ३-० असे निभ्रेळ यश मिळवले आहे.

विराटच्या नेतृत्वाखाली या संघात यष्टिरक्षकाची धुरा रिषभ पंतकडे कायम ठेवण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध तीन टी 20 मालिकेची सुरूवात 15 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

पहिला सामना धर्मशाळा येथे होणार आहे त्यानंतर मोहाली 18 सप्टेंबर ला आणि बेंगळुरू येथे 22 सप्टेंबर रोजी शेवटचा सामना होणार आहे त्यानंतर 2 ऑक्टोबरपासून तीन कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-