‘तिथल्या तिथे लगेच उत्तर द्या’; केंद्र सरकारने भारतीय लष्कराला दिले विशेषाधिकार

नवी दिल्ली | चिनी सैन्यांसोबत झालेल्या चकमकीनंतर वास्तविक नियंत्रण रेषेवर चिनी सैन्यांचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडून भारतीय लष्कराला विशेषाधिकार देण्यात आल्याची माहिती आहे.

चिनी सैन्यांसोबत झालेल्या चकमकीत 20 भारतीय जवान शहीद झाल्यानंतर केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. इंडिया टीव्हीने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

भारतीय लष्कराला चीनने आगळीक केल्यास उत्तर देण्याचं पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं आहे. तिथे योग्य वाटेल ती कारवाई करा सांगत भारतीय लष्कराला केंद्र सरकारकडून मोकळे हात देण्यात आलेत.

तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांकडून प्रयत्न सुरु असून चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आणि भारताचे परराष्ट्र मंत्री असलेले एस जयशंकर यांच्यात फोनवरुन बातचीत झाल्याची माहिती आहे.

महत्वाच्या बातम्या-

-जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, चीनला जशास तसं उत्तर देण्यास भारत सक्षम- नरेंद्र मोदी

-एसटीच्या मासिक आणि त्रैमासिक पाससंदर्भात परिवहनमंत्र्यांची नवी घोषणा

-भारत चीन सीमेवर टोकाचा संघर्ष, राऊतांचे पंतप्रधान मोदींना मुलभूत पण कळीचे प्रश्न

-कोरोनाविरुद्धच्या लढाईतील ‘पोलीस योद्धे’ या पदकाने गौरविले जाणार, गृहमंत्र्यांची मोठी घोषणा

-‘पुण्याचे कारभारी पालिकेतील सत्ताधाऱ्यांना भारी’… या महत्त्वाच्या निर्णयाला दिली स्थगिती!