लस न घेणारे इंदुरीकरच आता सांगणार लस घ्या

मुंबई | कोरोना महामारीनं जगभरात थैमान घातलं आहे. त्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण मोहिम राबवल्या जात आहेत. नागिरकांना लसीकरण करण्यासाठी आवाहन केलं जातय. त्यामुळे सरकारकडून कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुुरु आहेत.

लसीकरण हे कोरोना महामारीचं एकमेव शस्त्र आहे. लसीकरणामुळे कोरोनाला आळा घालण्यासाठी मदत होत आहे. त्यामुळे देशभरात लसीकरण मोहिमेवर भर दिला जात आहे.

नागरिकांनी पुढे येत लस घ्यावी, असं वारंवार सरकारकडून सांगितलं जात आहे. लसीकरणामुळे कोरोना बऱ्याचं अंशी आटोक्यात आल्याचं चित्र आहे.

कोरोना लस घेण्यासाठी अनेकजण प्रबोधन करताना दिसतात. अशातच आता निवृत्ती महाराज इंदुरीकरही लस घेण्यासाठी प्रबोधन करणार आहे. लस न घेणारे इंदुरीकर महाराजच लसीकरणासाठी प्रबोधन करणार म्हटल्यावर सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मागेच इंदुरीकर यांनी ‘मी लस घेतली नाही, घेणार नाही’, असं सांगितलं होतं. मात्र इतरांनी लस घेऊ नये असं मी कुठेही म्हटलेले नाही,’ असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

राज्य सरकार लसीकरण मोहिमेसाठी इंदुरीकर महाराजांची मदत घेणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी इंदुरीकरांशी फोनवर चर्चा केली आहे. त्यामुळे आता इंदुरीकर हे ग्रामीण भागात लसीकरणासाठी कीर्तनातून प्रबोधन करणार आहे.

आता लस घेऊ नका म्हणणारे इंदुरीकरच लस घ्या, असं प्रबोधन करणार आहे. त्यामुळे यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. अनेकांनी त्यांच्यावर टीकाही करायला सुरुवात केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रासह देशाभरात नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी म्हणून शासन प्रशासन प्रयत्नांची पराकष्ठा करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

  लस घेणं टाळणं महागात पडणार – अदर पुनावाला

  “कंगना एक महान व्यक्ती आहे, त्यांचा आदर करणं आपलं कर्तव्यच”

  “गोपीचंद पडळकरांच्या जीवाला धोका, सरकारनं त्यांना विशेष सुरक्षा द्यावी”

  “अजित पवारांना हात लावता येत नाही म्हणून त्यांच्या बहिणीवर कारवाई केली”

  “अनिल देशमुखांच्या तुरूंगातील प्रत्येक तासाची किंमत भाजपला मोजावी लागेल”