IPL 2022: आयपीएलची ‘ती’ मिस्ट्री गर्ल कोण?; अखेर पोरट्यांनी सोशल मीडियावरून शोधूनच काढलं

मुंबई | IPL च्या 15 व्या हंगामातील 20 वा सामना (IPL 2022) आज लखनऊ सुपर जायन्टस आणि राजस्थान राॅयल्स या दोन तगड्या टीममध्ये खेळला गेला. अटीतटीच्या या सामन्यात राजस्थानने लखनऊला धूळ चारली.

क्रिकेट आणि ग्लॅमर यांच्यातील नातं खूप जुनं आहे. अनेक खेळाडूंनी आयुष्याचं नातं बाॅलिवूडची जुळवून घेतलं आहे. खेळाडूंच्या पत्नी अनेकदा आयपीएल सामने पाहण्यासाठी मैदानात येत असतात.

त्यामुळे आयपीएलला आता ग्लॅमरचा तडका बसल्याचं पहायला मिळतंय. कॅमेरामन अनेकदा प्रेक्षकांमधून कॅमेरा फिरवताना अनेक सुंदर तरूणींचे चेहरे झळकतात आणि तेच चेहरे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

अशातच काल झालेल्या सामन्यात एका मिस्ट्री गर्लमुळे आता सोशल मीडियावर वातावरण तापलं आहे. सोशल मीडियावर या मिस्ट्री गर्लची एकच चर्चा आहे.

मिस्ट्री गर्ल आणि पोरट्यांनी शोधली नाही, असं कधी झालंच नाही. या सुंदर मुलीला सोशल मीडियावर चाहत्यांनी शोधून काढलं. सामन्यानंतर मिस्ट्री गर्लचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले.

या मिस्ट्री गर्लचं नाव आरती बेदी असल्याची माहिती मिळाली आहे. आरतीचे इन्ट्राग्रामवर तब्बल 57.4 हजार फाॅलोवर्स आहेत. तिने तिच्या बायोमध्ये अॅक्टर असं लिहिलं आहे.

दरम्यान, आरतीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अनेक ग्लॅमरल फोटो अपलोड केले आहेत. त्यामुळे आता तिचे फाॅलोवर्स देखील वाढलेत.

महत्त्वाच्या बातम्या-  

“संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय…”; राज ठाकरेंच्या भेटीनंतर वसंत मोरेंचं वक्तव्य चर्चेत

“अजून वेळ गेली नाही, उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत यावं”

“लोक बेकार असतात, माझ्या सारखे सेक्सी कपडे घालतात त्यांना…”

संजय राठोडांना पुन्हा मंत्री व्हायचंय, म्हणाले ‘उद्धव ठाकरे मला मानसन्मानाने ….’

“शरद पवारसाहेब नसते तर मी कधीही खासदार झाले नसते”