“…मग केंद्र सरकार काय फक्त घंटा वाजवायला बसलंय का?”

मुंबई | मोदी हे प्रत्येक बाबतीत राज्यांना जबाबदार धरत आहेत. मग केंद्र सरकार फक्त सत्ता भोगायला बसलं आहे काय? पेट्रोल-डिझेलची भाववाढ, कोळशाचा तुटवडा, ऑक्सिजनचा तुटवडा यासाठी त्यांनी राज्यांनाच जबाबदार ठरवलं. मग केंद्र काय फक्त घंटा वाजवायला बसलंय, असं म्हणत शिवसेनेनं केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर सडकून टीका केलीये. केंद्राचं सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरत आहे. विकत घेतलेल बहुमत म्हणजे सुशासन नाही. देश राम भरोसे आणि भोंगे भरोसे चालला आहे, असं शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलं आहे.

महागाई, कोरोना, बेरोजगारीवरून लक्ष उडवण्यासाठी पंतप्रधान वादग्रस्त विषयांना फोडणी देत आहेत. हे लक्षण बरे नाही. तुम्ही महाराष्ट्रासारख्या राज्यावर महागाईचे खापर फोडता, मग केंद्र सरकार काय करतं? हा प्रश्न उरतोच, असं शिवसेेनेनं म्हटलंय.

मागे कोरोना संक्रमणाची जबाबदारीही महाराष्ट्रावर टाकून पंतप्रधान नामानिराळे राहण्याचे प्रयत्न करत होते. अशाने केंद्र आणि राज्यांतील संघर्षाचा भडका उडेल. मोदींना तेच हवं आहे, असं म्हणत त्यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलवरील ‘व्हॅट’ कमी करावा असं पंतप्रधानांनी सुचवलं. स्वतःची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्याचा हा प्रयत्न आहे, असं ते म्हणालेत.

नरेंद्र मोदी यांनी केलेली वक्तव्ये एकतर्फी आणि दिशाभूल करणारी आहेत. बैठकीत संवाद एकतर्फीच होता. मुख्यमंत्र्यांना मते मांडण्याची संधीच दिली नाही, असंही शिवसेनेनं म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

सचिन पायलट यांच्या इशाऱ्याने राजस्थानमध्ये खळबळ; काँग्रेसचं टेंशन वाढलं 

Pune | पुणेकरांना झटका देणारी बातमी समोर; सीएनजीच्या दरात ‘इतक्या’ रुपयांनी वाढ 

पुणेकरांना झटका, सीएनजीच्या दरात ‘इतक्या’ रुपयांनी वाढ 

मोठी बातमी! मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका 

राज ठाकरेंच्या सभेसाठी आलेला ‘हनुमान’ पोलिसांच्या ताब्यात; झालं असं की…