‘एक वर्ष जनता ज्याचा शोध घेत होती, तो तिघाडीचा किमान समान कार्यक्रम हाच का?’; भाजपच्या ‘या’ नेत्याचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई | प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फो.टके सापडल्याप्रकरणी तब्बल 13 तासांच्या चौ.कशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना एनआयएने अ.टक करण्यात आली. यानंतर राज्यातील विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यामध्ये चांगलीच आ.रोप-प्रत्यारोपांची खेळी रंगली आहे.

मनसुख हिरेन मृ.त्यू प्रकरणात वाझे यांची भूमिका सं.शयास्पद असल्याने गेल्या काही दिवसांपासून ते एटीएस आणि एनआयएच्या र.डारवर होते. त्यांच्या अ.टकेनंतर भाजप नेते जास्तच आक्रमक झाले असल्याचं दिसतं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या अनेक नेत्यांनी सरकारला कोंडीत धरण्याचा प्रयत्न केला आहे.

सचिन वाझे या प्रकरणात रोज नविन ध.क्कादायक खुलासे समोर येत आहेत. या मुद्यावरुन भाजप पक्षाचे आमदार अशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला आहे.  यासंदर्भात अशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरुन एक ट्विट शेअर केलं आहे.

पोलिस अधिकाऱ्याच्या गाडीत लाखोंच्या नोटा आणि पैसे मोजायची मशिन सापडली. एक वर्ष जनता ज्याचा शोध घेत होती तो ‘तिघाडीचा किमान समान’ कार्यक्रम हाच का तो?, असा सवाल करत अशिष शेलार यांनी सरकावर टोला लगावला आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी देखील सचिन वाझे प्रकरणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं होतं. सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे लादेन आहे का?, असा सवाल करणारे मुख्यमंत्री कुठे आहेत?, असे प्रश्न निलेश राणे यांनी केले आहेत. त्याचबरोबर आतंकवाद्यांच्या वस्तू घेऊन पोलिस अधिकारी लोकांना ठार मारायला लागले आणि मुख्यमंत्री अशा अधिकाऱ्यांची बाजू घेत असतील तर त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचं निलेश राणे यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, तसेच सचिन वाझे यांच्या प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत का?, असा सवास विचारला जात होता. मात्र या सगळ्या मुद्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खुलासा केला. महाविकास आघाडीत कोणत्याही प्रकारचे मतभेद नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-