कर्णधार रोहितचं टेन्शन वाढलं! संघाचा हुकमी एक्का सामन्यापूर्वी संघाबाहेर

नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट संघ सध्या श्रीलंकेविरूद्ध टी ट्वेंटी मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिले दोन्ही सामने भारतानं जिंकून ही मालिका आपल्या खिशात घातली आहे.

मालिकेतील शेवटचा सामना धर्मशाला क्रिकेट मैदानात पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाची चिंता वाढवणारी घटना घडली आहे.

भारताचा या मालिकेतील सलामीवीर ईशान किशन जखमी झाल्यानं त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. परिणामी संघ व्यवस्थापक चिंतेत आहेत.

भारताचा नियोजित सलामीवीर आणि उपकर्णधार केएल राहुल सध्या वैयक्तिक कारणानं सुट्टीवर असताना निवड समितीनं ऋतुराज गायकवाड आणि ईशान किशन यांचा समावेश सलामीवीर म्हणून केला होता.

ऋतुराज गायकवाड आजारी असल्यानं आधीच मालिकेतून बाहेर गेला आहे. अशातच आता ईशान जखमी झाल्यानं त्याच्या जागी मयंक अग्रवाल सलामीला खेळताना पाहायला मिळू शकतो.

श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या दोन्ही सामन्यांंमध्ये खालच्या फळीतील फलंदाजांना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. श्रेयस अय्यर सध्या जबरदस्त फाॅर्मात असल्यानं व्यवस्थापकांची मधल्या फळीची चिंता सध्यातरी दूर झाली आहे.

केएल राहुल, विराट कोहली, रिषभ पंत, सुर्यकुमार यादव यांच्या अनुपस्थितीचा फायदा सध्या युवा खेळाडू घेताना दिसत आहेत. आपल्या दमदार खेळाच्या जोरावर भारतानं मालिका जिंकली आहे.

ईशान किशनच्या दुखापतीमुळं मात्र रोहित शर्माच्या अडचणीत वाढ झाली आहे. रोहित शर्मा सलामीला कोणासोबत येणारे हे अद्यापि स्पष्ट झालेलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “मी जर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असतो तर युक्रेन आणि रशिया युद्ध झालंच नसतं”

 मराठी भाषादिनी राज ठाकरेंची मोठी घोषणा; घेतला ‘हा’ निर्णय

तुमची लाडकी Wagon R येतेय नव्या रूपात; जाणून घ्या फिचर्स 

मोठी बातमी! दिशा सालियन बदनामी प्रकरणी राणे पिता-पुत्रांना झटका 

युक्रेनने तो प्रस्ताव फेटाळला; संतापलेल्या रशियानं केली मोठी घोषणा