“फैज यांची ती कविता हिंदू धर्मविरोधी म्हणणं म्हणजे हास्यास्पद”

नवी दिल्ली | पाकिस्तानी शायर फैज अहमद फैज यांच्या एका कवितेवरून नवा वाद उभा राहिला आहे. फैज यांची लाजिम है कि हम भी देखेंगे ही कविता हिंदू धर्मविरोधी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावर प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

फैज यांची कविता हिंदू विरोधी असल्याचं सांगणं म्हणजे हास्यास्पद आहे, अशा शब्दात अख्तर यांनी टीका केली आहे. ते दिल्लीमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी या सर्व घटनेवर भाष्य केलं आहे.

कवितेमध्ये कोणतीही ओळ ही हिंदू विरोधी नाही. ही कविता पाकिस्तानमधील हुकूमशाही विरोधात लिहिली गेली होती. फैज अहमद फैज यांनी जिया उल हक यांच्या सरकारविरोधात ती लिहिली होती. ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला, त्यावेळीदेखील त्यांनी कविता लिहिल्या होत्या, असं जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आयआयटी कानपूर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान ही कविता म्हटली होती. त्याविरोधात एका प्राध्यापकानं तक्रार केल्यानंतर प्रशासनानं चौकशी समिती नेमली आणि नवा वाद सुरू झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-