‘इथून पुढे आम्ही शिक्षणाचा ‘विनोद’ होऊ देणार नाही”

मुंबई | पाच वर्ष शिक्षणाचा ‘विनोद’ झाला, आता शिक्षणाचा ‘विनोद’ होऊ देणार नाही. आम्ही शिक्षणाला किमान समान कार्यक्रमात महत्त्वाचं स्थान देणार आहोत, असंं राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र विकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आधी शपथ घेऊ द्या, मग सर्व आश्वासनं पूर्ण करू, आम्ही किमान समान कार्यक्रम घेऊन तुमच्यासमोर आलो आहोत, शपथ घ्यायला तुमची परवानगी द्या, असंही जयंत पाटील परिषदेत बोलताना म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, नवाब मलिक आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन किमान समान कार्यक्रम काय आहे, याची माहिती दिली.

दरम्यान, शिवसेनेच्या जाहीरनाम्यातील 10 रुपयांची थाळी आणि 1 रुपयात क्लिनिक हेही आश्वासन पूर्ण करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलंय. शेतकऱ्यांची कर्जमाफी, तात्काळ मदत आणि पिकविमा या कार्यक्रमाला प्राधान्य देण्यात आलंय. शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला योग्य भाव मिळावा, यासाठीही या कार्यक्रमात घोषणा करण्यात आली आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-