भाजपला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावायची आहे, त्यासाठीच त्यांचा खटाटोप सुरू आहे- जयंत पाटील

मुंबई |  मुख्यमंत्री उद्धव यांच्या विधानपरिषदेवरील आमदार नियुक्तीवरून जोरदार राजकारण सुरू झालं आहे. महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळाने दोन वेळा प्रस्ताव पारित करून तो राज्यपालांकडे सोपवून देखील राज्यपाल महोदयांनी आणखी कोणताच निर्णय त्यावर घेतलेला नाही. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

महाराष्ट्रात पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवट लाहू व्हावी, असंच भाजपला वाटत असून त्याच दृष्टीने त्यांची पावलं पडत आहेत. तसंच त्यांचा त्यासाठीच खटाटोप सुरू आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

महाराष्ट्रात माध्यमांची गळचेपी सुरू आहे तसंच आणिबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये राज्यपाल महोदयांनी हस्तक्षेप करावा, अशा अशयाचं पत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना दिलं होतं. या पत्राचा एकंदरित सूर हा महाराष्ट्रात पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवट लागावी असाच आहे, अशी टीका पाटील यांनी केली आहे.

दुसरीकडे या प्रकरणी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीच मुख्यमंत्र्यांनी फोनद्वारे चर्चा केली. राज्यात आणि देशात कोरोनाची भयंकर परिस्थिती आहे. अशाात राज्यात जे काही राजकारण चाललेलं आहे ते काही बरोबर नाही, अशी नाराजी व्यक्त करत राज्याला सध्याच्या परिस्थितीत स्थैर्याची आवश्यकता आहे म्हणून माझ्या नियुक्तीबाबत आपण लक्ष घालावं, अशी विनंती उद्धव ठाकरेंनी मोदींकडे केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“…तर कोरोनाऐवजी लॉकडाऊनमुळे अधिक लोकांचा मृत्यू होईल”

-महाराष्ट्रात विरोधी पक्ष थयथयाट करून स्वत:चेच हसं करून घेतोय; सामनाच्या अग्रलेखातून टीकेचे बाण

-‘व्हाइट हाउस’ने पंतप्रधान मोदींना अचानक केलं ‘अनफॉलो’ यावर राहुल गांधी म्हणाले…

-चित्रपट सृष्टीतील दोन पिढ्यांमधला मार्गदर्शक दुवा निखळला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

-दिवंगत हरहुन्नरी कलाकार ऋषी कपूर यांना भावपुर्ण श्रद्धांजली- छगन भुजबळ