फेसबुक-जिओचा नवा प्लॅन; व्हॉट्सअपच्या मदतीनं ‘जिओमार्ट’ सुरु

मुंबई | जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकनं नुकतीच रिलायन्स जिओमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीमुळे नवा अध्याय सुरु झाला असून जिओ व्हॉट्सअपच्या मदतीनं आपल्या जिओमार्टची सेवा सुरु केली आहे.

जिओमार्ट हा एक इ-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. सध्या मुंबईच्या काही परिसरात याची सेवा सुरू करण्यात आली आहे. नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या भागात सध्या ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

जिओमार्टची सेवा घेण्यासाठी इच्छुक ग्राहकांना 8850008000  हा WhatsApp क्रमांक आपल्या फोन सेव्ह करावा लागेल. त्यानंतर व्हॉट्सअपवरुन या क्रमांकाला Hi पाठवल्यास एक लिंक येईल. ही लिंक ३० मिनिटांसाठी वैध असते. त्यापेक्षा अधिक वेळ लागल्यास पुन्हा मेसेज पाठवावा लागतो.

दरम्यान, तुम्ही तुमच्या मालाची ऑर्डर केल्यानंतर कंपनी तुमची ऑर्डर एका किराणा दुकानासोबत शेअर करेल. यानंतर ग्राहकांना ऑर्डरबाबत नोटिफिकेशन आणि दुकानाबाबतची सर्व माहिती मिळते. येत्या काळात फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या मदतीने जिओ मोठ्या प्रमाणावर पाय पसरण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

-या आहेत मुंबईच्या महापौर!; पण त्या अशा वेषात रुग्णालयात का पोहोचल्या???

-रितेश देशमुखने केले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक कारण…

-पोलिसांनी वारंवार सांगूनही ऐकलं नाही; ‘या’ कारणामुळे पुणे पोलिसांनी पकडले ६९९ जण

-“लॉकडाऊन संपण्याची चिन्हं नाहीत, हे प्रकरण मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबतच जाणार”

-अभिनेत्री विद्या बालननं कोरोनाच्या लढ्यात केलेली मदत ऐकून तुम्हालाही तिचा अभिमान वाटेल!