वारिस पठाणांच्या भडकाऊ भाषणाला ‘आम्ही भारताचे लोक’ राज्यघटनेने उत्तर देणार- आव्हाड

मुंबई |   एमआयएम नेते आणि माजी आमदार वारिस पठाण यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्यावर आता टीकेची झोड उठली आहे. त्यांच्याविरोधात कुठे निषेध मोर्चे तर कुठे त्यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळले जात आहेत. अशातच पठाण यांचा समाचार घेणारं ट्वीट राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

भारतीय संविधानावर निष्ठा आणि श्रद्धा असलेला मी एक ‘सच्चा भारतीय’ आहे याचा मला आज अभिमान वाटतोय. वारीस पठाण यांच्या भडकाऊ भाषणाला ‘आम्ही भारताचे लोक’ राज्यघटनेने उत्तर देणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सीएएच्या मुद्द्यावरुन देशात वातावरण तापलेलं असताना आता वारिस पठाण यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आम्ही १५ कोटी आहोत मात्र १०० कोटींना भारी आहोत हे लक्षात ठेवा, असं त्यांनी म्हटलं आहे. कर्नाटकमधील गुलबर्गा येथे वारिस पठाण यांच्या जाहीर भाषणाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी हे धक्कादायक वक्तव्य केलं असून त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी तसंच मनसेने वारीस पठाण यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. दुसरीकडे एमआयएमने पठाण यांच्यावर वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी कारवाई करत त्यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्याकरिता बंदी घातली आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

-उदयनराजेंच्या खासदारकीला संजय काकडेंचा आक्षेप; म्हणाले, उदयनराजेंचं योगदान काय??

-….म्हणून आता 12 वी चे विद्यार्थी नापास होणार नाहीत!

-“1947 मध्येच सगळ्या मुस्लिमांना पाकिस्तानात हाकलून द्यायला पाहिजे होतं”

-वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी वारीस पठाण यांच्यावर एमआयएमची मोठी कारवाई

-भारतात 1 कोटी लोक माझं स्वागत करणार- डोनाल्ड ट्रम्प