पोंक्षे, काय डोक्यावर पडलाय काय?; ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाड भडकले

मुंबई |अस्पृश्यता निवारणात स्वातंत्र्यवीर सावरकरांचं योगदान मोठं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यापेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ आहे, असं वक्तव्य अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलं होतं. यावरुन वाद सुरु झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पोंक्षेंवर निशाणा साधला आहे.

“हा डोक्यावर पडलाय काय?, काय बोलतो याचं याला कळेना”, असं म्हणत आव्हाडांनी बोचरी टीका केली आहे. पोंक्षेंच्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. त्यांच्यावर सर्व स्तरांतून टीका होताना दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनीही पोंक्षेंना लक्ष्य केले आहे. पोंक्षे, म. फुलेंनी तुमच्या अनेक पिढ्यांचा उद्धार केलाय. फुले आणि बाबासाहेबांचा द्वेष करणारी तुमची हलकट प्रवृत्ती जाता जात नाही. आजारपणामुळे डोक्यावर परिणाम झाल्याचे जाणवते आहे. औषध वेळेवर घेत चला. वेळेवर दवापाणी नसलं की मेंदूवर परिणाम होतो, अशी टीका त्यांनी केली आहे.

 

दरम्यान, पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील कार्यक्रमात बोलताना पोक्षेंनी वरील वक्तव्य केलं होतं.

 

महत्त्वाच्या बातम्या-

-पोंक्षे, औषध वेळेवर घेत चला, डोक्यावर परिणाम होतोय- अमोल मिटकरी

-आशिष शेलारांची राष्ट्रवादीला बेडकाची उपमा; रोहित पवार यांचं सणसणीत प्रत्युत्तर

-छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट काढणे हे माझं स्वप्न होतं पण…- राज ठाकरे

व्यंगचित्रासाठी परफेक्ट चेहरे कोणते?; राज ठाकरेंनी सांगितली ‘या’ नेत्याची नावं!

-निवडणुकीनंतर महाराष्ट्रात झालेलं राजकारण अत्यंत दुर्दैवी.. हे चांगलं नाही- राज ठाकरे