इंदिरा गांधींबाबतच्या ‘त्या’ वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड म्हणतात…

मुंबई | इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा दाबला, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. बीडमध्ये संविधान बचाव सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापत असल्याचं दिसून येताच आव्हांडांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

इंदिरा गांधी यांच्या असामान्य कर्तुत्वा बद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. त्यांनी घेतलेले निर्णय हे क्रांतिकारी होते पण आणिबाणी बद्दल मतमतांतर असू शकतात. मात्र एक सत्य मी लपवू शकत नाही. इंदीराजींची आणि मोदी शहांची तुलना होऊ शकत नाही ते जवळपास ही पोहचू शकत नाही, असं ट्विट करत आव्हाडांनी आपलं मत वक्तव्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या मताशी मी सहमत आहे. त्यांच्या या वक्तव्याशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना सहमत असतील, असा टोला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लगावला.

दरम्याम, जितेंद्र आव्हाड यांनी वेळीच खुलासा केला ते बरं झालं. तरी मी यासंदर्भात एक नक्कीच सांगेन की, कोणीही आमच्या नेत्यांचा अनादर केला तर चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-ऐसे कैसे चलेगा खानसाब?; पुणे पोलिसांचं ट्विट

-सतास्थापनेचे शिलेदार खासदार संजय राऊत सत्तास्थापनेनंतर पहिल्यांदाच गेले मंत्रालयात

-“एसआयटीचा तपास झाला तर ज्यांनी खरोखरच दंगल भडकवली त्यांची नावे त्यातून बाहेर येतील”

-बीगबींनी केलं रोहित शर्माच तोंडभरून कौतुक

-…तर भाजपने मला कधी ओळखलंच नाही- मुख्यमंत्री