ज्योतिरादित्य सिंधिया काँग्रेस सोडणार?; चर्चांना उधाण

नवी दिल्ली |  काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपल्या ट्वीटर बायोमधून काँग्रेस हटवल्याने ते काँग्रेस सोडण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. ते येत्या काही दिवसांत काँग्रेस पक्षापासून अलिप्त होतील, अशा चर्चा आता रंगायला सुरूवात झाली आहे.

लोकांनी केलेल्या सूचनेनुसार मी माझा बायो छोटा केला आहे, असं ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटलं आहे. मात्र काँग्रेसचा एवढा दिग्गज नेता आपल्या ट्वीटर बायोमधून काँग्रेसचा उल्लेख कोणत्याही कारणाशिवाय काढून शकत नाही, अशी चर्चा लोकांध्ये आहे.

दुसरीकडे महिनाभरापूर्वी मी माझ्या ट्विटर अकाउंटवरील बायोमध्ये बदल केला. लोकांनी केलेल्या सूचनांमुळे मी माझा बायो छोटा केला. सध्या यासंदर्भात सुरू असलेल्या चर्चांना कुठलाही आधार नाही, असं म्हणत मी काँग्रेस सोडणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने सपाटून मार खाल्ल्यानंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला होता.

 

महत्वाच्या बातम्या-