“आमचे सरकार आल्यानंतर अधिकाऱ्यांना कोंबडा बनवू”

कोलकाता | भाजपचे महासचिव आणि पश्चिम बंगालमधील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष कैलास विजयवर्गीय यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही अधिकाऱ्यांना कोंबडा बनवू, अशी धमकी त्यांनी दिली आहे. शुक्रवारी पश्चिम बंगालमधील पुरुलिया येथे एका सभेत ते बोलत होते.

ज्यांना कोंबडा बनवायचं आहे, अशा सर्व अधिकाऱ्यांची यादी आमच्याकडे तयार आहे. त्यामुळे आमची सत्ता आली की या अधिकाऱ्यांना आम्ही पाहून घेवू. आम्ही शांत बसणारे नाही, असं विजयवर्गीय म्हणाले आहेत. ते सभेला संबोधित करत होते.

सरकारी अधिकाऱ्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास आम्ही सहन करणार नाही. आम्ही काही बांगड्या घातलेल्या नाहीत. आम्ही इमानदारीने काम करत आहोत, याचा अर्थ असा नाही की आम्हाला मर्यादा तोडता येत नाहीत, असा धमकीवजा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून विजयवर्गीय यांच्यावर विरोधकांनी टीका करण्यास सुरु केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-