“आम्ही त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवला, म्हणून आम्हाला सरकार वाचवता आलं नाही”

भोपाळ | मध्यप्रदेशात काँग्रेस सरकारमधील 22 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर मोठा राजकीय भूकंप निर्माण झाला होता. बहुमत नसल्यानं माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.

कमलनाथ सरकार कोसळल्यानंतर भाजप नेते शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता कमलनाथ यांनी 41 दिवसांनंतर सर्व राजकीय घडामोडींवर एक नवा खुलासा केला आहे.

काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांची काही आमदारांसोबत दिवसातून तीन वेळा बोलणं व्हायचं. तसेच काही आमदारांनी आम्हाला पतर येणार असल्याचं सांगितलं होतं. आमदारांनी आम्हाला विश्वास दिला होता. त्यामुळे आम्ही निर्धास्त होतो. त्यांच्यावर आम्ही अवलंबून राहिलो. त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवल्यानंच आम्हाला सरकार वाचवता आलं नाही, असा खुलासा कमलनाथ यांनी केला आहे.

दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे भाजपच्या संपर्कात होते असा दावा कमलनाथ यांनी केला आहे. लोकसभेत एक लाखाहून अधिक मतांनी झालेला पराभव त्यांना पचवता आला नाही, त्यामुळे त्यांनी भाजपत प्रवेश केला, असं कमलनाथ यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

-‘मी काही गमावलं नाहीये…’; इरफान खानच्या पत्नीची काळजाला भिडणारी पोस्ट

-“आज गळे काढणारेच त्या वेळी सत्तेत होते, त्यांनी मुंबईच्या आयएफएससीसाठी शून्य योगदान दिलं”

-सर्व अफवा फेटाळून लावत किम जोंग उनची दणक्यात एण्ट्री; सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल

-“तबलिगी जमातने जाणूनबुजून कोरोना पसरवला, कारवाई करणारच”

-किम जोंगची तब्येत धडधाकट… ट्रम्प म्हणतात, मला आता यावर काहीच बोलायचं नाही!