फायनल अल्टीमेटलाही कंगना अनुपस्थित? आता मुंबई पोलीस कंगनाला अ.टक करणार?

मुंबई | सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्युनंतर अभिनेत्री कंगना राणावत सतत चर्चेत आहे. कंगनाने बॉलीवूड इंडस्ट्री विरुद्ध जणू बंडच पुकारलं आहे. कंगनाने इंडस्ट्रीत पडद्याआड घडणाऱ्या अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. तसेच कंगनाने अलीकडच्या काळात अनेक वा.दग्रस्त विधानं देखील केली आहेत.

बॉलीवूड मधील नेपो.टीझमचा मुद्दा असो किंवा महाराष्ट्र सरकार, कंगना नेहमीच उघडपणे आ.रोप करत असते. कंगना नेहमी ट्वीटरवरून अनेकांवर निशाणा साधत असते. मात्र, आता एक ट्वीट कंगनाच्या चांगलंच अंगलट आलं आहे. कंगना राणावतनं केलेल्या एका ट्वीटमुळे तिला आणि तिची बहिण रंगोली हिला अ.टक होऊ शकते.

कंगना रानावातनं काही दिवसांपूर्वी धार्मिक तेढ पसरवनारं वक्तव्य केलं होतं. बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये मुस्लीम समाजाचं प्राबल्य आहे. मी झाशीची राणी हा चित्रपट बनवून इंडस्ट्रीतील मुस्लीम प्राबल्य मोडून काढलं, असं कंगना काही दिवसांपूर्वी बरळली होती. कंगनाच्या याच वक्तव्याविरोधात वांद्रे कोर्टात कंगनाविरुद्ध याचिका दाखल केली होती.

कंगना राणावत हिंदू मुस्लीम समुदायात धार्मिक तेढ वाढवण्याचं काम करत आहे. कंगना धर्मावरून अनेकवेळा वा.दग्रस्त आणि आक्षेपार्ह्य ट्वीट करत आहे. त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होत असल्याचा आरोप कंगनावर करण्यात आला होता. यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार कंगनावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यानंतर मुंबई पोलिसांनी कंगनाला चौकशीसाठी दोनवेळा समन्स बजावला होता. मात्र, कंगना दोन्हीवेळी चौकशीसाठी हजर झाली नाही. कंगनाला काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांनी तिसऱ्यावेळी समन्स बजावला होता.

त्यामुळे आज कंगनाला आणि उद्या रंगोलीला वांद्रे पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर रहावं लागणार होतं. मात्र, अद्याप कंगना चौकशीसाठी हजर राहिल्याचे वृत्त समोर आलं नाही. कंगना आज वांद्रे पोलीस ठाण्यात हजार राहणार कि नाही? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

तसेच कंगना राणावत या समन्स विरोधात आता हायकोर्टाचे दार ठोठावण्याची शक्यता आहे. तसेच याप्रकरणी आता पुढे काय होतंय यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

कंगनाचा हा समन्स ‘फायनल अल्टीमेट’ आहे. कंगना जर यावेळीही अनुपस्थित राहिली तर कंगनाला अ.टक होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे कंगनाला मुंबई पोलीस केव्हाही अटक करू शकतात, असं बोललं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

चंद्राबाबूंच्या मुलाला धूळ चारणाऱ्या पुण्यात शिकलेल्या आमदाराला भेटलो तेव्हा…

नेहा कक्करच्या हनिमूनचा बेडरूम मधील ‘तो’ व्हिडिओ तूफान व्हायरल; पहा व्हिडिओ

मोदी महाविकास आघाडीचं सरकार पाडत राष्ट्रपती राजवट लागू करणार? चंद्रकांत पाटील म्हणाले…

आजच तुमचं खातं जनधन खात्यात बदलून घ्या, तुम्हालाही होईल लाखोंचा फायदा!

आमीर खान ‘या’ बड्या अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा झाला होता!