“56 इंचाची छाती आहे, तर मग घाबरायची काय गरज? पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा…”

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वी पंजाब दौऱ्यावर होते. यावेळी पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी पाहायला मिळाल्या. या प्रकरणानंतर देशातील राजकारणात चांगलीच गरमा गरमी पाहायला मिळत आहे.

या मुद्द्यावरून भाजप नेत्यांनी पंजाबमधील काँग्रेस सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. पंजाब सरकारने जाणीवपूर्वक पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत चूक केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे.

काँग्रेस व भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असताना काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी पंतप्रधान मोदींवर टीकेची झोड उठवली आहे.

मोदींनी पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा यांना भीती वाटली नाही. त्यांना आपल्या देशातच फिरायला भीती वाटते, असा घणाघात कन्हैया कुमार यांनी केला आहे.

दोन दिवसांपासून टीव्हीवर सुरू आहे की पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक झाली. 24 तास हेच सुरू आहे. मात्र, पंतप्रधानांकडे 56 इंचची छाती आहे, तर मग त्यांना घाबरायची काय गरज?, असा खोचक सवाल देखील कन्हैया कुमार यांनी उपस्थित केला आहे.

हे म्हणतात पंतप्रधान कोणत्याही पक्षाचे असत नाहीत, देशाचे असतात. पंतप्रधान कोणत्याही पक्षाचे नसतील तर मग त्यांनी कोणत्याही पक्षाचा प्रचारही करायला नको, अशी टीका देखील कन्हैया कुमार यांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे.

एकीकडे म्हणतात मजबूत पंतप्रधान आहेत, आणि दुसरीकडे पळून जातात. पंतप्रधानांचा कुठे कार्यक्रम असेल तर सुरक्षेची जबाबदारी एसपीजीची असते.

एसपीजीचा प्रमुख गृहमंत्री अमित शाह आहेत. त्यामुळे सुरक्षेतील त्रुटीचा प्रश्न पंतप्रधानांनी आपल्या जिगरी मित्राला विचारला पाहिजे, अशी खरमरीत टीकाही कन्हैया कुमार यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

क्रिकेट जगतात खळबळ! शेन वाॅर्नचा खळबळजनक खुलासा म्हणाला,”पाकिस्तानच्या कॅप्टनने…

“आपल्या पंतप्रधानांची सुरक्षा रामभरोसे नाही, त्यांचा बालही बाका होणार नाही”

मॉडर्न नवरीची धमाकेदार एन्ट्री, पाहुणेही झाले अवाक; तुम्हीही व्हिडीओ पाहतच राहाल

राखी सावंतला भेडसावतेय ‘ही’ भीती, बिग बॉसच्या घरात केला खुलासा

राजधानी दिल्लीत 55 तासांचा कर्फ्यू; पोलीस प्रशासन अॅक्शन मोडवर