मोठी बातमी! कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमारचा हार्ट अटॅकने मृत्यू

बंगळुरू | कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमारचं निधन झालं आहे. त्यांचा बंगळुरूच्या विक्रम रूग्णालयात उपचार सुरू होता. जिथे पुनीतला मृत घोषीत करण्यात आलं. सकाळी 11. 30 वाजता दुखत असल्याच्या तक्रारीवरून अभिनेता राजकुमारला दाखल करण्यात आलं होतं.

पुनीत राजकुमार हा 46 वर्षांचा होता. तो ज्येष्ठ अभिनेते राजकुमार यांचे पुत्र होता. पुनीतने आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. 1985 मध्ये तो ‘बेट्टाडा होवू’ चित्रपटात दिसला होता. या भूमिकेसाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.

पुनीत राजकुमार यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. ‘सुवरत्थान’ या चित्रपटात ते अखेरचे दिसले होते. त्याच फिल्मसाठी त्यांची खूप वाहवा झाली होती. ‘सुवरत्थान’ या चित्रपट याच वर्षी प्रदर्शित झाला होता.

पुनित राजकुमार यांनी 29 पेक्षा जास्त कन्नड चित्रपटात अभिनय केला आहे. बाल कलाकार म्हणून पुनित यांनी राष्ट्रीय पुरस्कार मिळवला होता.

‘अभी’, अप्पू, ‘वीरा कन्नडिगा’, ‘अजय’, ‘अरासु’, ‘राम’, ‘हुडुगारु’ आणि‘अंजनी पुत्र’ यासारख्या चित्रपटात काम केलं आहे. पुनित राजकुमार यांचा अखेरचा चित्रपट युवारत्न हा होय. गतवर्षी हा चित्रपट रिलीज झाला होता. 

महत्वाच्या बातम्या-

“बाळासाहेब ठाकरे नसले तरी उद्धव ठाकरे आहेत, कोणावर अन्याय होणार नाही”

“मी तर वर्षभरापूर्वीच सांगितलं होतं की एनसीबी आता नमो कंट्रोल ब्यूरो झालीये”

‘हिवाळी अधिवेशनात अनेक नेत्यांची…’; नवाब मलिकांच्या वक्तव्याने खळबळ

“लाडक्या आर्यनला बेल मिळाल्यानं राष्ट्रवादी अन् शिवसेनेचा जीव भांड्यात पडला”

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये ‘इतक्या’ रूपयांची वाढ, वाचा आजचा दर