इंदोरीकरांविरोधात गेल्या तर तोंड काळं करू; करणी सेनेचा तृप्ती देसाई यांना इशारा

मुंबई |  पुत्रप्रातीसाठी ऑड-इव्हन फॉर्म्युला दिल्यापासून प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर अडचणीत आले आहेत. NCPNDT या कायद्यांतर्गत त्यांना आता नोटीस बजावण्यात आली आहे तर तृप्ती देसाई महाराजांवर गुन्हा दाखल व्हावा, यासाठी आक्रमक झाल्या आहेत. या सगळ्या प्रकरणानंतर आता महाराजांचे पाठीराखे आणि टीकाकार एकमेकांवर तुटून पडले आहेत. अशातच करणी सेनेने देसाई यांना इशारा दिला आहे.

तृप्ती देसाई जर इंदोरीकर महाराजांच्याविरुद्ध गेल्या तर त्यांचे तोंड काळं करु, असा अशारा महाराष्ट्र करणी सेनेचे अध्यक्ष अजय सिंह सेंगर यांनी दिला आहे.

तृप्ती देसाई जर इंदोरीकर महाराजांच्याविरुद्ध गेल्या तर त्यांचे तोंड काळे करु. तृप्ती देसाई या ख्रिश्चन धर्माच्या आहेत त्यांनी हिंदू धर्मात लुडबुड करु नये, असं अजय सिंगर म्हणाले आहेत.

दुसरीकडे महाराजांवर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही त्यांच्या आश्रमात जाऊन त्यांच्या तोंडाला काळं फासू, असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

गुंडांचं आत्मबल वाढवणारं ‘पालकत्व’ बीडला मिळालं हे आमचं दुर्दैव; पंकजांचा धनंजय मुंडेंवर निशाणा

-एकेकाळी बसस्टॉपवर रात्र काढणाऱ्या निलेश साबळेने मुंबईत घेतलं स्वत:चं घर!

-ठाकरे सरकार फार दिवस टिकणार नाही- नारायण राणे

-इंदुरीकरांच्या वक्तव्यावरून होत असलेल्या वादात आता शिवप्रतिष्ठानची उडी!

-इंदुरीकरांना पाठिंबा देण्यासाठी तांदळवाडीचे महाराज झोपले बाभळीच्या काट्यावर!