“काश्मिर भारताचा होता अन् इथून पुढेही भारताचाच राहिल…”

नवी दिल्ली |  काश्मीर आमचा होता, आमचा आहे आणि आमचाच राहिल. भारताच्या बाजूने आम्ही आहोत. त्यामुळे काश्मीर हा आमचा अंतर्गत विषय असून काश्मिरी लोकांच्या समस्या दूर करण्याची जबाबदारी स्थानिक नेत्यांची आहे, असं उलमा ए हिंदने पाकिस्तानला ठणकावून सांगितलं आहे.

काश्मीरप्रश्नी पाकिस्तान खोटं पसरवण्याचा उद्योग करीत असल्याचे उलमा-ए-हिंदचे पदाधिकारी महमूद मदनी यांनी म्हटले आहे.

काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानकडून भारतीय मुस्लिमांना डिवचण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र उलमा ए हिंदने हा प्रयत्न हाणून पाडला आहे.

आम्हाला विश्वास आहे की, काश्मीर खोऱ्यातील स्थिती सामान्य होण्याकरीता सरकार आवश्यक पावले उचलत आहे. आम्ही काश्मीर मुद्द्यावर भारताच्या सोबत आहोत, असं उलमा ए हिंदने म्हटलं आहे.

जे काश्मिरी लोक आपली सांस्कृतीक ओळख सुरक्षित ठेऊ इच्छितात… सरकारने त्यांचा आवाजही ऐकायला हवा, असं मत महमूद मदनी यांनी व्यक्त केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-