कॉरंन्टाईनचा शिक्का असताना फिरत होता; शासनाने हुकलेल्या कलेक्टरला केलं निलंबित!

तिरूवनंतपुरम |  सिंगापूर आणि मलेशिया येथून हनिमूनहुन केरळ येथे होम क्वारंटाइन असणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याने घरातून पळ काढला होता. कलेक्टरसारख्या जबाबदार व्यक्तीने कॉरन्टाईनचा नियम तोडल्यामुळे त्याला केरळ राज्य शासनाने निलंबित केलं आहे.

केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी कोल्लम जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित करत असल्याचं जाहीर केलं आहे. कोल्लमच्या सब कलेक्टर यांनी अधिकाऱ्यांना न सांगता राज्य सोडलं आहे. त्यांचं हे वर्तन ठीक नाहीये, असं ते म्हणाले.

जे कॉरन्टाईन आहेत किंवा डॉक्टरांच्या निगराणीखाली आहेत त्यांना आपण शासनाच्या आदेशाचे सक्त पालन करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत.परंतू कलेक्टरसारख्या जबाबदार व्यक्तीने राज्य सोडून पळून गेल्याने राज्याची बदनामी झाली आहे. म्हणून आम्ही त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशात राहणारे अनुपम मिश्रा केरळच्या कोल्लम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत. अनुपम यांचं नुकतेच लग्न झाले होते. पत्नीसोबत हनिमूनसाठी सिंगापूर आणि मलेशिया येथे गेले होते. 19 ला अनुपम परदेशातून परतला. हा अधिकारी सरकारी निवासस्थानी होम क्वारंटाइमध्ये होता. अधिकाऱ्याने घरातून पळ काढत उत्तर प्रदेशातील आपल्या मूळगावी धाव घेतली. त्यामुळे घर सोडणं त्यांना चांगलंच महागात पडलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

-विश्वास नांगरे-पाटील अॅक्शनमोडमध्ये; आता येऊन दाखवा बाहेर

-टी-20 विश्वकप विजेत्या टीमचा शिलेदार जोगिंदर शर्मासह ‘हे’ नामवंत खेळाडू कोरोना विरुद्धच्या लढाईत करताहेत पोलीस ड्युटी

-‘या’ त्रिसूत्रीनुसार कोरोनावर प्रतिबंध करण्यात येत आहे- आरोग्यमंत्री

-गरज पडल्यास संपूर्ण राज्यात “सरकारी कर्फ्यू” जाहीर करावा- मनसे

-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत साधला पुण्यातील नायडू हॉस्पिटलमधील नर्सशी संवाद