मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबद्दल किरीट सोमय्या यांचा धक्कादायक गौप्यस्फोट! म्हणाले रश्मी ठाकरे यांनी नाईकांची जमीन घेत…

मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अलिबाग पोलिसांनी अ.टक केलं आहे. इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांना अर्णव गोस्वामींनी आ.त्मह.त्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप अन्वय नाईक यांच्या किटुंबियांनी केला होता. यानुसार अलिबाग पोलिसांनी अर्णव यांच्यावर कारवाई करत त्यांना ग.जाआड केलं आहे.

अर्णव गोस्वामी यांच्या अ.टकेनंतर महाराष्ट्रातील राजकारण देखील चांगलंच तापलं आहे. अर्णव गोस्वामी यांच्या अ.टकेवरून भाजप नेते सातत्याने महाराष्ट्र सरकारवर टीका करत आहेत. अशातच आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.

किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.  रश्मी ठाकरे यांच्यासोबतच सोमय्या यांनी मनीषा रवींद्र वायकर यांच्यावरही आरोप केले आहेत. यासंबंधित त्यांनी एक ट्वीट करत माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अन्वय नाईक यांच्या परिवाराशी आर्थिक व व्यावसायिक संबंध आहेत. रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर यांनी रायगड जिल्ह्यातील कोलेई येथून अन्वय नाईक आणि अक्षता नाईक यांच्याकडून जमिनी घेतल्या. उद्धव ठाकरे तुम्ही यासाठी अर्णव गोस्वामी यांना लक्ष करत आहात का?, असा सवाल किरीट सोमय्या यांनी विचारला आहे.

तसेच किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत जमिनीची काही कागदपत्रे देखील पोस्ट केली आहेत. या ट्वीटमध्ये त्यांनी रश्मी ठाकरे यांनी जी जमीन नाईक यांच्याकडून घेतली आहे. त्या जमिनीचा सात बारा पोस्ट केला आहे. किरीट सोमय्या यांच्या गंभीर आरोपानंतर आता रश्मी ठाकरे याप्रकरणी काय बोलतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, अर्णव यांना अ.टक केल्यानंतर त्यांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी न्यायालयानं अर्णव गोस्वामी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

स्थानिक न्यायालयानं अर्णव गोस्वामी यांना 14 दिवसांची कोठडी सुनावल्यानंतर अर्णव गोस्वामी यांच्या वकिलांनी मुंबई हाय कोर्टात गोस्वामी यांच्या जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, मुंबई हायकोर्टाने अर्णव गोस्वामी यांचा जामिन अर्ज फेटाळून लावला आहे.

मुंबई हायकोर्टाने अर्णव गोस्वमिंचा जामीन अर्ज फेटाळताच अर्णव गोस्वामी यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात अर्णव गोस्वामी यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

फडणवीसांचं कौतुक करत राऊतांचा कॉंग्रेसला टोला! लवकरच मोठा राजकीय भूकंप पहायला मिळणार?

सुशांत सिंह राजपूतची बहीण अर्णव गोस्वामींना समर्थन देत म्हणतेय…

धक्कादायक! अर्णव गोस्वामी का.रागृहात मोबाईल वापरत होते, पोलिसांनी केली कठोर कारवाई

अर्णव गोस्वामी यांच्या वकिलांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय! सर्वोच्च न्यायालय उद्या करणार सुनावणी

अमीर खान हात जोडून सर्वांची माफी मागतोय! जाणून घ्या नक्की यामागील कारण काय आहे?