मुंबई | दिवाळीनंतर राज्यातील तीन मंत्री आणि तीन जावई यांचे घोटाळे बाहेर काढणार असं किरीट सोमय्या यांनी रविवारी ट्विट करत सांगितलं होतं. मात्र, नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर किरीट सोमय्या यांनीही पत्रकार परिषद घेत आरोपांची मालिका सुरु केली आहे. किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधलाय.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी त्यांची पत्नी, मुलगा आणि आईच्याही नावे बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर केल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोमय्यांनी हा दावा केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
अजित पवारांच्या कंपनीत अनेक बिल्डरांचे पैसे आले आहेत. ते परत दिले गेलेच नाही. अजित पवारांच्या खात्यात शेकडो कोटी आले. त्यांनी जावई, नीता पाटील, सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि एए पवार यांच्या खात्यात हे पैसे वर्ग केले. ए ए पवार हे अजित पवार यांच्या आईचं नाव आहे, असं सोमय्या म्हणालेत.
अजित पवार यांनी घोटाळ्याचे पैसे पूर्ण ट्रान्सफर केले आहेत, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत घेत हा दावा केला आहे.
गेल्या महिन्याभरापासून आयकर खात्याच्या धाडी सुरू आहेत. हजारापेक्षा जास्त कोटीची बेनामी संपत्ती बाहेर आली आहे. शेकडो कोटीचे नॉन ट्रान्स्फरंट एन्ट्रीज आहेत. त्याला हवालाही म्हणता येईल आणि शेल कंपन्यांचे व्यवहारही म्हणता येईल, असं किरीट सोमय्या म्हणाले.
बंद झालेल्या कंपन्यातूनही पैसे आलेले आहेत. आपण पाच पंधरा लेअर सुरू केल्या म्हणून आमची चोरी पकडली जाणार नाही, असं शरद पवारांना वाटतं का? असा सवाल देखील किरीट सोमय्या यांनी केली आहे.
आम्ही गेल्या दोन महिन्यापासून अभ्यास करत होतो. माझी टीम काम करत होती. नंतर हा आरोप सिद्ध झाला. गुरु कमोडिटी हे व्यक्तीचं नाव आहे. मी कुणाच्या व्यक्तिगत आयुष्यात जात नाही. पवार कुटुंबीयांनी महाराष्ट्राला लुटलं आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
गेल्या 19 दिवसात पवार कंटुंबाचा सातबारा आम्ही त्यांच्या हातात दिला आहे. म्हणून आयकर विभाागाने आणि नंतर ईडीने धाडी मारल्या. मात्र या धाडीपासून लक्ष विचलीत करण्यासाठी मलिकांच्या माध्यमातून समीर वानखेडेंचं प्रकरण बाहेर काढण्यात आलं, असं म्हणत किरीट सोमय्यांनी पवार कुटुंबावर निशाणा साधला आहे.
अजित पवार यांनी एक हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम नातेवाईकांच्या खात्यात वर्ग केली आहे. आम्ही तसा आरोप केला होता. मात्र, ईडी आणि आयकर विभागाच्या धाडीतून हे सिद्ध झालं आहे, असं सांगतानाच 9 दिवस ईडीची धाड सुरू आहे हे अजित पवारांनी सांगांवं, असं सोमय्या म्हणाले.
दरम्यान, दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोमय्यांनी हा दावा केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे सोमय्यांच्या या दाव्यावर अजित पवार काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे,.
महत्वाच्या बातम्या –
मी सरळमार्गाने आणि नैतिकतेला धरून चालणारा व्यक्ती- अनिल देशमुख
नवाब मलिकांच्या आरोपांवर फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
“देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन हा ड्रग्जचा खेळ सुरु आहे”
समीर वानखेडेंविरोधात तक्रार करणाऱ्या वकिलांना जीवे मारण्याची धमकी
आदित्य ठाकरेंना पर्यावरण खातं कसं मिळालं?, आतली माहिती आली समोर