“चंद्रकांतदादा मी पण शिवसैनिक, मराठ्याची औलाद वाटेला आलात तर…”

मुंबई | चंद्रकांत पाटील यांच्यावर मी काहीही बोलणार नाही हे मी आधीच सांगितलं आहे. मात्र चंद्रकांतदादा जर बोलत असतील तर मी पण शिवसैनिक आहे. मराठ्याची औलाद आहे, माझ्यात पण एक मराठा लाख मराठा दौडतो. उगाच डिवचण्याच्या प्रयत्न करु नका, असं इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलाय.

तुमच्या वाटेला आम्ही येणार नाही. मात्र तुम्ही आमच्या वाटेला आलात तर आम्ही अजिबात सोडणार नाही, असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

गेले आठवडाभर विरोधक राणी बागेच्या मुद्द्यावरुन निशाणा साधत आहेत. विरोधक आरोप करतायेत भ्रष्टाचार झालाय. मात्र भ्रष्टाचार झालाय तर तर सिद्ध करा. हात जोडून विनंती आहे, असं त्या म्हणाल्या.

आपण कायदे मानतो तुम्ही आरोप सिद्ध करा राजकीय, प्रशासकीय कोणीही असुदेत कारवाई केली जाईल, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं. आज विरोधी पक्ष कमी आणि वैरत्व जास्त आहे. राजकीय पातळी खाली जात आहे. अनेक तरुण मुले या राजकरणाला कंटाळले आहेत, असंही त्या म्हणाल्या.

टीका करणाऱ्या विरोधकांची किव करावीशी वाटते. विरोधकांना खुले चॅलेंज जी आत्ता निविदा आलीय ती 92.52 कोटी आणि 94.42 कोटींची आहे. या किमतीत तुम्ही निविदा घेऊन या तुमचं स्वागत आहे. स्वीकारा आमचे चॅलेंज, असं आव्हान किशोरी पेडणेकर यांनी विरोधकांना दिलं आहे.

गुजरातमध्येही 264 कोटी खर्च पेंग्विनसाठी येत आहे. तेथे 6 पेंग्विन आणले होते आज तिथे 5 पेंग्विन आहेत. त्यातील एक पेग्विंन मृत झाला आहे. तिकडे पण नागरिकांचे पैसे आहेत ते योग्य खर्च होत आहेत का?, असा सवालही किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या-

“पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 2024 मध्ये पराभव शक्य, पण…” 

राज्याच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, जाणून घ्या आजची आकडेवारी 

“भाजपनं आपल्या जन्माचा दाखला दाखवावा”; संजय राऊत संतापले

पुढील 2 दिवस महत्त्वाचे! राज्यातील ‘या’ भागात थंडीच्या लाटेची शक्यता

देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले “युतीमध्ये असताना…”