कोरोना पसरतोय जगभरात; महाराष्ट्रातील 600 यात्रेकरु अडकले इराणमध्ये

मुंबई | कोरोना व्हायरसने चीनमध्ये हाहाकार माजवला आहे. आता कोरोनाचा विळखा जगभर पसरत असल्याचं दिसत आहे. कारण इराक व इराणमध्ये तीर्थयात्रेसाठी गेलेले महाराष्ट्रातील 600 यात्रेकरू इराणची राजधानी तेहरानमध्ये अडकले आहेत.

‘कोरोना’च्या साथीमुळे इराक व इराणसह तेथील अन्य देशांनी सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे भारतीय यात्रेकरूंना गेल्या आठ दिवसांपासून तेथेच अडकून पडावे लागले आहे. विशेष म्हणजे यात सोलापूर जिल्ह्य़ातील सुमारे 44 यात्रेकरूंचा समावेश आहे.

गेल्या २० फेब्रुवारी रोजी मुंबईहून विमानाने इराणची राजधानी तेहरानकडे हे यात्रेकरु रवाना झाले होते. इराकची राजधानी बगदाद येथे प्रसिध्द सुफी संत हजरत गौस पाक जिलानींचा दर्गाह तसेच मोहम्मद पैगंबरांचे नातू हजरत इमामहुसेन तेथील स्थळांचे दर्शन घेण्यासाठी हे यात्रेकरू गेले होते.

दरम्यान, कोरोना व्हायरस जगभर पसरत असून त्याने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. खबरदारी म्हणून अनेक देशांनी आपल्या सीमा बंद केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या- 

-खटला चालवण्यास केजरीवाल सरकारने मंजुरी दिल्यानंतर कन्हैया कुमारची पहिली प्रतिक्रिया म्हणतो; …

-“केंद्र सरकारने ओबीसींची स्वतंत्रपणे जनगणना करण्याचा ठराव फेटाळला”

-ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; तब्बल 1 लाख 1 हजार पदांची होणार मेगाभरती

-‘बळीराजा नको करू आत्महत्या’ शाळेत मुलाची कविता; शेतकरी बापाची घरी आत्महत्या

-राज्यसभेत पाठवून राष्ट्रवादी करणार ‘या’ बड्या नेत्याचं राजकीय पुनर्वसन