मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि कुटुंबियांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. यानंतर समीर वानखेडेची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. उद्धवसाहेब एका महिलेवरील खासगी हल्ले बाळासाहेबांना पटले असते का?, असा सवाल क्रांती रेडकर यांनी केला आहे.
माननीय उद्धव ठाकरे साहेब, लहानपणा पासून मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झालेली मी एक मराठी मुलगी आहे.. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांचा आदर्श घेऊनच मी वाढले, असं क्रांती रेडकर पत्रात म्हणाल्यात.
कुणावर अन्याय करू नये आणि आपल्यावर होणारा अन्याय सहन तर मुळीच करू नये हे त्या दोघांनी शिकवलं.. तोच धडा गिरवत आज मी एकटीने माझ्या खाजगी जीवनावर हल्ला करणाऱ्या उपद्रवी लोकांविरोधात ठामपणे उभी आहे.. लढते आहे, असं क्रांती रेडकर यांनी म्हटलंय.
आज बाळासाहेब असते तर त्यांना हे नक्कीच पटलं नसतं. एका महिलेवर आणि तिच्या परिवारावर होणारे खाजगी हल्ले हे राजारणाचं किती नीच स्वरूप आहे हे नेहमीच त्यांच्या विचारातून आमच्या पर्यंत पोहोचलेलं आहे. आज ते नाही पण तुम्ही आहात.. त्यांची सावली त्यांची प्रतिमा आम्ही तुमच्यात बघतो.. तुम्ही आमचे नेतृत्व करत आहात आणि तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, असं क्रांती रेडकर यांनी म्हटलंय.
तुम्हीं कधीच माझ्यावर व माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही ह्याचि मला खात्री आहे.. म्हणून एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहतेय.. तुम्ही योग्य तो न्याय करा अशी विनंती, असंही क्रांती रेडकर म्हणाल्यात.
महत्वाच्या बातम्या-
अजित पवारांना मोठा धक्का; ‘या’ जवळच्या व्यक्तीच्या घरी आयकर विभागाने टाकला छापा
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण!
“शरद पवारांना आणि उद्धव ठाकरेंना लाज वाटायला हवी”
पेट्रोल-डिझेलचा दर वाढला, पाहा काय आहे आजचा दर
काय सांगता ! चक्क अस्वल करतोय ब्रेक डान्स, पाहा मजेशीर व्हिडीओ