…अन् लालकृष्ण अडवाणींना झाले अश्रू अनावर; पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | काश्मिरी पंडितांवर आधारित ‘शिकारा’ चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला. हा चित्रपट पाहण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे चित्रपटगृहात गेले होते.

चित्रपट बघताना आडवाणी यांना अश्रू अनावर झाले. त्यांचा भावूक झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अडवाणी भावूक झालेले पहायला मिळाले.

‘शिकारा’ चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर लालकृष्ण आडवाणी यांचा चित्रपटगृहातील व्हिडीओ शेअर केला आहे.

दरम्यान, ‘शिकारा’ चित्रपटात प्रेमकथा दाखवली आहे. हा चित्रपट काश्मीरमध्ये पंडितांवर झालेल्या अन्यायावर आधारित आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता आदिल खान आणि अभिनेत्री सादिया यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-शरद पवारांनी सांगितलेला ‘तो’ किस्सा एैकताच उपस्थितांमध्ये हशा पिकला

-छ. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात लालसी सरकारने आमच्या भगिनींची सुरक्षा वाऱ्यावर सोडली- चंद्रकांत पाटील

-उद्धवजी, शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्यावरच कळेल किती आक्रोश आहे- राजू शेट्टी

-“शरद पवार सिर्फ नामही काफी है. महाराष्ट्राचा हा नेता जेव्हा दिल्लीत उभा राहतो तेव्हा दिल्लीलाही झुकावं लागतं”

-चितळे उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा काकासाहेब चितळे काळाच्या पडद्याआड