कोरोना व्हायरसने क्रिकेट जगतातला पहिला बळी घेतला

मुंबई |  जगभरात कोरोनाने हजारो बळी घेतले आहे. अमेरिका आणि इटलीमध्ये तर कोरोनाने कहर केला आहे. दररोज मृतांच्या संख्येत भर पडत आहे. आता कोरोनाने क्रिकेट जगतातला पहिला बळी घेतला आहे.

सोमवारी लान्सशायर कौंटी क्रिकेट क्लबचे अध्यक्ष डेव्हीड हॉजकिस यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनावर मात करण्यात त्यांना अपयश आलं. अखेर दुर्देवाने त्यांचा कोरोनाने बळी घेतला आहे. ते 71 वर्षांचे होते.

डेव्हीड गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. मागील तीन वर्षापासून ते लान्सशायरचे मॅनेजर होते. तसंच त्यांनी लान्सशायरच्या खजिनदार आणि उपाध्यक्ष या पदावरही काम केलं होतं.

दरम्यान, कोरोनामुळे स्पॅनिश फुटबॉलपटू फ्रान्सिस्को गार्सिया, पाकचे स्क्वॅशपटू आझम खान यांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे जगभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा वाढतच चालला आहे. आज आकडा वाढून 7 लाख 85 हजार इतका झाला आहे.

महत्वाच्या बातम्या –

-शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी! ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय

-ममता बॅनर्जींचा थेट उद्धव ठाकरेंना फोन; सेना आमदार सरनाईक दखल घेण्यासाठी रवाना

-गानसम्राज्ञी लतादिदी सरसावल्या; कोरोनाच्या लढाईत दिली इतक्या लाखांची मदत

-…म्हणून महाराष्ट्र उद्धवजींच्या हाती असल्याचा अभिमान वाटतो- जितेंद्र आव्हाड

-लॉकडाउनला ठेंगा! भाजप आमदारानं थाटात केलं मुलीचं लग्न