“पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद द्या, अनोख्या प्रकाशपर्वात सहभागी होऊ या”

मुंबई  | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिटे हातात दिवे घेऊन उभं राहण्याचं आवाहन संपूर्ण जनतेला दिलं आहे. या आवाहनानंतर मोदींवर टीका झाली आणि काहींनी समर्थनही केलं. अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद द्या, असं म्हटलं आहे.

एक समाज… एक जन…. एक राष्ट्र ….कोरोना विरोधातील लढाईत आपण एकटे नाही तर सारे सोबत आहोत. चला 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिटे आपण सारे आत्मबळाच्या एका अनोख्या प्रकाशपर्वात सहभागी होऊ या. मा. मोदीजी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊ या,अर्थात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळूनच!’, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. असं असताना देशाची परिस्थिती पाहता मोदींनी दिवे लावण्याचं आवाहन नागरिकांना करावं हे काही अनेकांना रूचलं नाही. मोदींकडून काही वेगळ्या अपेक्षा होत्या. त्यांनी सद्यस्थितीवर भाष्य करायला हवं होतं पण त्यांनी तसं करता ही संधी साधत इव्हेंट करण्याचं ठरवलं, अशा वेगवेगळ्या टीका मोदींवर राजकीय नेत्यांनी केल्या.

दरम्यान, मोदींवर जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, संजय राऊत यांसारख्या राजकीय मंडळींना टीका केलीच आहे. पण सोशल मीडियावर देखील मोदींवर या उपक्रमामुळे टीका होत आहे.

 

महत्वाच्या बातम्या –

-देशात राहून बेइमानी करणाऱ्यांवर ‘सर्जिकल स्ट्राइक’ करा, भोजपुरी अभिनेत्याची पंतप्रधानांकडे मागणी

-निवडणुकीला कुणाला मतदान करायचं?; हे सांगणारे मुल्ला-मौलवी कुठे आहेत?- राज ठाकरे

-‘देशात सध्या लॉकडाऊन पण नंतर आम्ही आहोतच’; राज ठाकरे यांचा विकृतांना इशारा

-“मरकजमध्ये जो प्रकार घडला, अशा लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे”

-देश म्हणून आपण चाललोय कुठे??; राज ठाकरेंची तोफ पुन्हा मोदींविरोधात धडाडली