“दाऊद हे नाव मुस्लिमांचंच का? मराठ्यांमध्येही दाऊद आहेत”

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे समीर वानखेडे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

नबाव मलिकांचं गौप्यस्फोटाचं सत्र आतादेखील सुरू असल्याचं दिसून येतंय.  अशातच नवाब मलिकांनी समीर वानखेडे यांच्यावर पुन्हा आरोप केले आहेत.

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या शाळेतील दाखला दाखवत नवाब मलिक यांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा मुस्लीम असल्याचा आरोप केला होता.

समीर वानखेडे यांनी बनावट दाखला बनवला आणि सादर केला, असा आरोप मलिकांनी केला आहे. समीर वानखेडे यांच्या शाळेच्या दाखल्यात वडिलांचं नाव दाऊदच आहे, असं मलिक म्हणाले आहेत.

या आरोपानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी समीर वानखेडे यांच्या कुटूंबीयांची बाजू घेत नवाब मलिकांवर टीका केली आहे.

नवाब मलिक यांनी जातीवाचक किंवा व्यक्तीगत राजकारण करू नये. दाऊद हे नाव केवळ मुस्लिमांचंच आहे का ? मराठ्यांमध्येही आहेत, असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत.

तपास यंत्रणा आणि न्याय व्यवस्था आपलं आपलं काम करत आहे. मग नवाब मलिक हवेत गोळीबार का करत आहेत?, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

अनिल देशमुख किंवा परमबीर यांना कायदा समान असल्याचं देखील दरेकर म्हणाले आहेत. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करा. परमबीर सिंह आमचे काही लागतात का?, असा प्रश्न देखईल त्यांनी यावेळी विचारला आहे.

शरद पवार म्हणतात, चर्चेतून मार्ग काढा, पण चर्चा ही फक्त दिखाव्यासाठी आहे. कोणतीही ठोस पाऊले उचलली गेली नाहीत, असंही दरेकर म्हणाले आहे.

दरम्यान, प्रविण दरेकर यांच्या वक्तव्यामुळे आता प्रविण दरेकर यांच्या अ़डचणी वाढण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘दुसरा गाल पुढं करणं हे भीतीचं लक्षण नाही तर…’; कंगनाला मिळालं जोरदार प्रत्युत्तर

“आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला, आता आम्हीही उतरावं का?”

 “नियती माफ करणार नाही, प्रत्येक सेकंदाची किंमत भाजपला चुकवावी लागेल”

 अभिनेत्री प्रिती झिंटानं दिली गूड न्यूज! वयाच्या 46व्या वर्षी बनली जुळ्या मुलांची आई

  भर सामन्यात चहर आणि गप्टीलची नजरेची खुन्नस, पाहा व्हायरल व्हिडीओ