‘चला भारत बंद करूयात आणि…’; भारत बंदवर कंगनाचं मोठं विधान!

नवी दिल्ली | अभिनेत्री कंगना राणावत गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. कंगना काही तरी बोलली आणि वाद झाला नाही, असं क्वचितंच घडत असेल. कंगना सोशल मीडियावर अनेक वादग्रस्त वक्तव्य करत असते. कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे तिला भरपूर नुकसान देखील सहन करावं लागलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशात चालू असणाऱ्या भारत बंद आंदोलनावर देखील कंगनाने अनेक वादग्रस्त विधानं केली आहेत. अशातच आता कंगनाने पुन्हा एकदा भारत बंदवर वादग्रस्त विधान केलं आहे. कंगनाने ट्वीटरवर हे विधान करत सद्गुरुंचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

कंगनाने ट्वीट करत म्हटले आहे की,  चला भारत बंद करूयात. असं तर या बोटीवर वादळाची कमी नाही. तरीही कुऱ्हाडी घेवून या आणखी काही भाग करूयात. प्रत्येक आशा इथे दररोजच मरण पावत असते.

देशप्रेमींनाही जावून सांगा की, या देशाचा एक तुकडा तुम्ही देखील मागा. तुम्ही देखील रस्त्यावर उतरा आज आपण हा विषयच संपवून टाकू, असं कंगनाने ट्वीट करत म्हटलं आहे.

कंगनाचे हे ट्वीट प्रचंड वेगानं व्हायरल होत आहे. कंगनाचे चाहते तिच्या या विधानाला सपोर्ट करत आहेत. तर काही लोक कंगनाच्या या विधानामुळे तिला ट्रोल करू लागले आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कंगनाने दिल्लीतील शाहीन बाग आंदोलनात सामील झालेल्या एका वयोवृद्ध आजींवर कमेंट करत सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. काही वेळाने तिने ही पोस्ट डिलीट केली होती.

कंगनाने या आजींवर कमेंट करताना म्हटलं होतं की, दिल्लीतील शाहीन बाग आंदोलनात सामील होणाऱ्या आजी शेतकरी आंदोलनात देखील सामील झाल्या आहेत. 100 रुपयांसाठी त्या आंदोलनात भाग घेतात.

कंगनाच्या या वक्तव्यामुळे तिला ट्रोल करण्यात येवू लागल्यानंतर तिने ही पोस्ट डिलीट केली होती. शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या आजींवर कमेंट करत कंगनाने वादग्रस्त वक्तव्य केल्यानं अनेक लोक कंगनावर टीका करू लागले आहेत. तसेच अनेक लोक कंगनाने माफी मागावी, अशी देखील मागणी करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवणारे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल नजरकैदेत

भाजपला मोठा धक्का! भाजप नेतृत्वातील महायुतीतून आणखी एक पक्ष बाहेर पडणार?

अभिनेता दिलीप कुमार यांची प्रकृती नाजूक, पत्नी सायरा बानो भावूक होत म्हणाल्या…

लग्नाच्या पाचव्या दिवशीच आदित्य नारायणचा पत्नीसोबतचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पहा व्हिडिओ

मनोरंजन विश्वाला आणखी एक धक्का! ‘या’ बड्या अभिनेत्रीचं कोरोनामुळे नि.धन