LICची भन्नाट योजना! दर महिन्याला मिळणार 12 हजार रूपये

मुंबई | आयुष्यात अनेक चढउतार येत असतात. अनेकदा पैशांची टंचाई देखील जाणवू लागते. त्यामुळे आर्थिक नियोजन असणं महत्त्वाचं ठरतं. (LIC Saral Pension Plan)

अश्या अनेक योजना असतात त्यामुळे आपलं पुढील आयुष्य सुखकर जाऊ शकतं. अशीच एक योजना एलआयसीने देखील आणली आहे.

ज्यामध्ये फक्त एकदाच प्रीमियम भरल्यानंतर तुम्हाला आयुष्यभरासाठी 12,000 रुपये प्रति महिना मिळणार आहेत. ‘एलआयसी सरल पेन्शन प्लॅन’ खास वृद्धापकाळासाठी बनवला आहे.

इतकंच नाही तर या योजनेत दरमहा 12 हजार रुपयांशिवाय कर्जासह इतरही अनेक सुविधा मिळतात. ही योजना नॉन-लिंक्ड आहे. त्याचबरोबर सिंगल प्रीमियम, वैयक्तिक तत्काळ वार्षिकी योजना आहे.

पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांनंतर कधीही यावर कर्ज मिळू शकतं.यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धती उपलब्ध आहेत.

एलआयसीच्या वेबसाईटवर या योजनेविषयी माहिती मिळू शकते. ही योजना वयानुसार काम करते. किमान खरेदी किंमत वार्षिकी निवड आणि निवडलेला पर्याय यावर अवलंबून आहे.

पॉलिसी घेणार्याचे वयावर अवलंबून असेल.मात्र, या योजनेत कमाल खरेदी किंमत मर्यादित नाही. 40 ते 80 वयोगटातील वृद्ध व्यक्तींसाठी ही योजना लागू असणार आहे.

दरम्यान, काही अटींवर मासिक पेन्शनचा देखील लाभ घेता येऊ शकणार आहे. त्यामुळे वद्धपकाळात या योजनेमुळे टेन्शनमुक्त जगता येणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

रोहित पवारांनी व्यक्त केली मंत्री होण्याची इच्छा, म्हणाले…

पुढील 24 तास महत्त्वाचे; राज्यातील ‘या’ 11 जिल्ह्यांना अलर्ट जारी

लता मंगेशकर अजूनही आयसीयूमध्येच; प्रकृतीबाबत डाॅक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

सलमान खानचं टेन्शन संपेना! शेजाऱ्यानेच केलेत धक्कादायक आरोप

अजित पवारांची मोठी घोषणा! ‘या’ ग्रामपंचायतीला मिळणार 50 लाखांचं बक्षीस