लोचा झाला रे! लग्नासाठी ती चार तरुणांसोबत पळाली अन् मग घडला ‘हा’ विचित्र प्रकार

लखनऊ | अलिकडे काही वर्षांमध्ये पळून जाऊन लग्न करण्याचं फ्याड खूप वाढलं आहे. प्रेमप्रकरणात बऱ्याचवेळा जोडपी घरातून पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतात. सध्या उत्तर प्रदेशमधील असंच एक लग्न संपूर्ण देशभर चर्चेत आहे. या लग्नाची चर्चा होण्यामागे कारणही अगदी तसंच आहे.

उत्तर प्रदेशातील टांडा येथील अजीमनगर परिसरात राहणारी एक मुलगी लग्नासाठी एक नाही दोन नाही तर तब्बल चार जणांसोबत पळून गेली. मात्र, चार जणांसोबत पळालेल्या या तरुणीला नेमकं लग्न कोणासोबत करावं? हेच समजत नव्हतं. मग शेवटी यावर खूप विचित्र पद्धतीने निवाडा करण्यात आला.

पाच दिवसांपूर्वी एक तरुणी गावातीलच चार जणांसोबत घरातून पळून गेली. यानंतर ती मुलगी 2 दिवस मुलांच्या नातेवाईकांकडे लपून राहीली. नातेवाईकांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी त्या तरुणीसमवेत मुलांना त्यांच्या गावात पाठवले. यानंतर हे प्रकरण निवाड्यासाठी पंचायतीसमोर गेले.

हे प्रकरण मिटवण्यासाठी गावात पंचायत बसवण्यात आली. यावेळी पंचायतीने मुलीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. लग्नासाठी चार मुलांपैकी एकाची निवड करण्यास मुलीला सांगण्यात आलं. मात्र, मुलगी यावेळी संभ्रमात पडली. नेमकं लग्न कोणाबर करावं हे तिला समजत नव्हतं.

हे प्रकरण पंचायतीसमोर आल्यानंतर चार तरुणांपैकी एकंही तरुण स्वत:हून लग्नासाठी तयार झाला नाही. चौघांपैकी एकंहीजण यवेळी लग्णासाठी पुढे आला नाही. यामुळे या प्रकरणातील पेच आणखी वाढला.

तरुणी आणि चारही तरुणांना दोन दिवसाचा अवधी देण्यात आला. मात्र यातील कोणीच काही निर्णय घेऊ शकलं नाही. मग या लग्नाचा निवाडा करण्यासाठी पंचायतीने अलग शक्कल लढवली. पुन्हा एकदा पंचायत बसवण्यात आली.

पंचायतीने चिट्ठ्या उधळून लग्नाचा निर्णय घेतला. या वेळी चारही तरुणांच्या नावाच्या चिट्ठ्या उधळण्यात आल्या. यानंतर ज्या तरुणाचं नाव चिट्ठीत आलं त्याच्यासोबत तरुणीचं लग्न ठरवण्यात आलं. सध्या संपूर्ण परिसरात याच लग्नाची चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या –

सुशांत सिंह प्रकरण; एनसीबी दाखल करणार आ.रोपपत्र, रिया चक्रवर्तीसह ३३ जणांचा समावेश

आज ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त झालं सोनं; पाहा काय आहे भाव

दिलासादायक! १ एप्रिलपासून वीज ‘इतक्या’ टक्क्यांनी होणार स्वस्त

वडिलांना ‘टकला’ म्हणणं मुलीला पडलं महागात; बापानं उचललं ‘हे’ टोकाचं पाऊल

….यामुळं पेट्रोल डिझेल होऊ शकतं स्वस्त; स्टेट बॅंकेचा अहवाल