केंद्र सरकार लॉकडाऊनचा काळ वाढवेल काय? शरद पवार म्हणतात…

मुंबई |  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांना एका व्यक्तीने लॉकडाऊन अजून वाढेल काय? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला त्यांनी सविस्तर उत्तर दिलं.

केंद्र सरकारने जाहीर केलेला लॉकडाउन संपायला अजून 2 आठवडे आहेत. या काळात लोकांनी जर नीट काळजी घेतली तर कदाचित हा काळ अजून वाढण्याची गरज भासणार नाही. मात्र जेवढी जास्त काळजी घेता येईल तेवढी जास्त काळजी घ्या, असं पवार म्हणाले.

तसंच या संकटाच्या काळआत आपण सर्वांनी एकत्र येऊन यावर मात करायला हवी. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून मी देखील घराबाहेर पडलेलो नाही. तुम्हीही घराबाहेर पडू नका. सरकारने घालून दिलेल्या नियमांचं पालन करा, असं आवाहन त्यांनी आजच्या फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून केलं.

दरम्यान, परराज्यातून कामासाठी आलेल्या मजुरांनी जिथे आहेत तिथेच थांबावं, राज्य सोडू नये. त्यांची उपासमार होणार नाही याची काळजी महाराष्ट्र सरकार घेईल, असंही पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

-“माफ करा आम्हाला, पोलीस आणि डॉक्टरांनो आमचा आत्मा मेला आहे”

-नमाजसाठी इमारतीच्या छतावर गर्दी; 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

-उद्धव ठाकरेंनी वेगळं काय केलं?; शिवसेनेच्या दंडुक्याला भाजपचं प्रत्युत्तर

-आपण घराबाहेर पडलो तर अख्ख्या पिढीला याचे परिणाम भोगावे लागतील- शरद पवार

-“कोरोनामुळे अमेरिकेत 1 ते 2 लाख लोकांचा मृत्यू होण्याची भीती”