ठाकरे सरकारचा भाजपला आणखी एक मोठा धक्का!

मुंबई | भाजपचे मुख्य प्रवक्ता माधव भंडारी यांची पुनर्वसन प्राधिकरणातील नियुक्ती महाराष्ट्र शासनाकडून रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने भाजपला धक्के देण्याचे सत्र सुरुच ठेवल्याचं दिसत आहे.

फडणवीस सरकारने प्राधिकरण आणि महामंडळांवर अनेक नियुक्त्या केल्या होत्या. या नियुक्त्या रद्द करण्याचं सत्र नव्या सरकारने सुरुच ठेवलं आहे. बुधवारी सरकारने भंडारी यांची समितीच्या उपाध्यक्षपदावरुन गच्छंती केली आहे.

28 एप्रिल 2018 रोजी माधव भांडारी यांची महाराष्ट्र राज्य पुनर्वसन आणि पुनर्स्थापना संनियंत्रण समितीच्या उपाध्यक्षपदी फडणवीस सरकारने नियुक्ती केली होती. त्यामुळे भंडारी यांना मंत्रिपदाचा दर्जा मिळाला होता. मात्र, आता त्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपसाठी हा धक्का आहे.

भाजपच्या स्थापनेपासून माधव भंडारी पक्षाशी निष्ठावान राहिले आहेत. भाजपनेही त्यांना वेळोवेळी संधी दिली आहे. भंडारी मुख्य प्रवक्ता म्हणून पक्षाची भूमिका चोखपणे मांडत आले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-ज्या भाषेनं इंग्रजांनाही वठणीवर आणलं तीदेखील मराठीच- उद्धव ठाकरे

-दिल्ली पोलिसांना खडेबोल सुनावणाऱ्या न्यायाधीशांची बदली!

-तुम्ही काहीही करा, पण शिवसेनेसमोर ‘पेच’ निर्माण होणार नाही; ‘सामना’तून भाजपवर टीकास्त्र

-“सावरकर हा भाजपसाठी श्रद्धेचा विषय राहिला नसून फक्त राजकारणाचा विषय बनलाय”

-जीवन जगायचं कसं हे मराठी भाषेनं शिकवलं- उद्धव ठाकरे