नवनीत राणांनी दगा दिला; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा आरोप

अमरावती : लोकसभा निवडणूक 2019 मध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा दणदणीत पराभव करणाऱ्या खासदार नवनीत कौर राणा भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी नवनीत राणा यांना निवडून दिल्याबद्दल कार्यकर्त्यांचे मंगळवारी आभार मानले. पण यानंतर सभेत गोंधळ सुरू झाला. काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्य काँग्रेसविरोधात काम करत असल्याचा थेट आरोप केला.

काही महिन्यांपूर्वी झालेल्या काँग्रेस मेळाव्यात राणांकडून काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी एकनिष्ठेचे वचन घेतले होते. हे वचन राणांनी मोडल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांकडून होत आहे.

अमरावतीत सोमवारी काँग्रेसची ‘महापर्दाफाश’ सभा झाली. यादरम्यानच माणिकराव ठाकरेंनी नवनीत राणांना निवडून दिल्याबद्दल कार्यकर्त्यांचे आभार मानले. पण यावेळेस नवनीत राणा यांनी काँग्रेसला दगा दिल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला.

दरम्यान, आपण कोणत्याही परिस्थितीत भाजपात जाणार नाही, असे वचन नवनीत राणा यांनी दिले होते. पण काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नवनीत राणा यांनी भेट घेतली होती. या भेटीनंतर नवनीत राणा या देखील भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या-