महाराष्ट्र दिन यंदाही साधेपणानेच; राज्य सरकारच्या सूचना जारी

मुंबई| देशात कोरोनाचा कहर अगदी भयावह करणारा आहे. कोरोना व्हायरसचा विळखा दिवसागणिक वाढत चाललाय. देशभरातील अनेक कोरोना योद्धे गेल्या वर्षभरापासून कोरोनापासून आपल्याला वाचवण्यासाठी लढत आहेत. या लढाईत अनेक योद्ध्यांना कोरोनानं ग्रासलं देखील. तसेच अनेक डॉक्टर्स, नर्सेस यांनी या लढाईत आपले प्राण देखील गमावले आहेत.

दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. अशातच देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ही लाट अधिक भयंकर असल्याचं सांगितलं जातं आहे.

कोरोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या विचारात घेऊन कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी आणि विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन जोरदार काम करत आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने 13 एप्रिलपासून 1 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत राज्यात संचारबंदीसह कडक निर्बंध लागू केले आहेत.

आता हे कडक निर्बंध वाढवण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे. त्यातच आता राज्याचा उत्सव म्हणजेच महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन, यावर देखील कोरोनाचा प्रभाव दिसून येत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात यंदा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन म्हणजेच महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेमार्फत तशा सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाने कोरोनाच्याच्या अनुषंगाने दिलेल्या  नियमाचे काटेकोर पालन करण्यात यावे. सर्वांसाठी मास्क बंधनकारक राहील, याची दक्षता घेण्यात यावी, असेसुद्धा राज्य सरकारने म्हटले आहे.

जिल्हा मुख्यालयात केवळ एकाच ठिकाणी सकाळी 8 वाजता फक्त ध्वजारोहण करण्यात यावं. विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी विभागीय आयुक्त पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती यांनी ध्वजारोहण समारंभाकरीता योग्य ती व्यवस्था करावी, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

ध्वजारोहण करणारे पालकमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित राहू न शकल्यास, विभागीय आयुक्त मुख्यालयी विभागीय आयुक्तांनी व जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी यांनी ध्वजारोहण करावे.

दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. यामुळे नियमांचं पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या – 

IPL 2021: चेन्न्ईचा सलग पाचवा विजय, चेन्नईची टीम पॉईंट्स…

‘अनेक लोक भूकेने मरत आहेत आणि तू…..’…

लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बॉलिवूडच्या…

जाणून घ्या! कोरोना संसर्गादरम्यान व्यायाम करणे आरोग्यासाठी…

1 मे पासून सुरू होणाऱ्या लसीकरणाबाबत केंद्र सरकारने दिली…