ज्येष्ठांसाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांनी केली मोठी घोषणा

कोल्हापूर | 65 वर्षावरील ज्येष्ठ स्त्री-पुरुषांना उतारवयात मदत करण्याची शासनाची भूमिका आहे. त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थींचे अनुदान दुप्पट करण्यात येईल, अशी घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

65 वर्षांवरील ज्येष्ठांचा मदतनिधी मासिक एक हजार रुपयांवरुन दुप्पट म्हणजे दोन हजार रुपयांपर्यंत वाढवला जाणार असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं आहे.

मागील पाच वर्षांत बंद झालेल्या निराधार योजनेची पेन्शन योजना सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा 21 हजारांवरुन 50 हजार रुपये करण्यात येईल, असंही हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महापूरग्रस्त महिलांनी मायक्रो फायनान्स, खासगी सावकारांकडून घेतलेलं कर्ज माफ करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असंही मुश्रीप यांनी सांगितलंय.

महत्वाच्या बातम्या-

-“पाटीलसाहेब, छात्या बडवणं बंद करा आता श्रीरामालापण त्रास होईल”

-झेंडा बदलल्यानंतर आज मनसेचा पहिला वर्धापनदिन

-कौतुकास्पद! पेटलेला वणवा विजवण्यासाठी सय्याजी शिंदे सरसावले

-“धोका पत्करायला भारतीय बँका जगात अव्वल आहेत; खातेदारांनी घाबरुन जाऊ नये”

-लेकींनी विश्वचषकाच्या फायनलपर्यंत मजल मारली याचा अभिमान पाहिजेच- उदयनराजे भासले