महाराष्ट्रातील या शहरानं करुन दाखवलं; 900 पर्यंत गेलेला कोरोनाबाधितांचा आकडा 90च्या आत आणला!

मालेगाव हे राज्यातील नव्हे तर सबंध देशातील दाटीवाटीचं शहर. मार्च दरम्यान कोरोनाचा धुमाकूळ महाराष्ट्रात सुरू झाला. मुंबई, पुणे या बड्या शहरांत कोरोनाचा फास घट्ट आवळला जाऊ लागला. यादरम्यान मालेगाव शहरात कोरोनानं अशी काही दहशत माजवली की, राज्यातील कोरोनाचं नवं हाॅटस्पाॅट म्हणून शहराला घोषित करावं लागलं.

Corona 10

मालेगावात जून महिन्यात कोरोनाबाधितांचा आकडा ८०० च्या वर जाऊन पोहचला. कोरोना संक्रमणाचा विळखा तालुक्याच्या ग्रामीण भागालाही पडू लागला. कोरोना बाधीत रूग्णांच्या मृत्यूचा आकडा तर छातीत धडकी भरवणारा होता. विषाणूला आटोक्यात आणण्याचे लाख प्रयत्न करूनही प्रशासन व आरोग्य यंत्रणा तोकडी पडली. शहर भीतीच्या सावटाखाली मात्र कायम होतं.

Corona Recoverd

आकडा ९०० पार पोहचला. आता सरकारनंच मालेगावच्या कोरोना विरुध्दच्या लढाईत उतरायचं ठरवलं. राज्याच्या आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी ‘मिशन मालेगाव’ सुरू केलं. सरकार, प्रशासन व आरोग्य यंत्रणेच्या समन्वयातून अवघ्या महिन्याभरात ९०० चा हा आकडा ९० च्या खाली जाऊन पोहचलाय. मालेगाव प्रशासनानं यासाठी केलेल्या कष्टांची पराकाष्ठा ही नक्कीच कौतुकास्पद म्हणावी लागेल.

Corona 1

मालेगाव शहराचे प्रामुख्यानं पूर्व व पश्चिम असे दोन भाग पडतात. पूर्व भाग मुस्लिमबहुल तर पश्चिम भागात हिंदू लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आढळून येते. या दोन्ही भागातील प्रश्न व समस्यांचे स्वरूप वेगळं होतं. प्रशासकीय दृष्ट्या कामकाज सुरळीत पाडण्यासाठी शहराचे दोन भाग करण्यात आले. कोव्हिड इमर्जन्सी सेंटर उभारण्यात आले. रमजान सारखा सामुहिक सण घरातच पार पाडण्यासाठी प्रबोधनहो करण्यात आलं. विशेष बाब म्हणजे या काळात नागरिकांनी पुरेपुरं सहकार्य दिलं.

Ujjain Corona

शहरात वेगानं होणारं कोरोनाचं संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी मालेगाव टास्क फोर्सची प्रशासनानं निवड केली. वैद्यकीय यंत्रणा जलद व सुरळीत पार पडावी यासाठी डाॅक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफची तातडीने भरती करण्यात आली. एवढंच नाही तर राज्यातील तज्ञ डाॅक्टरांकडून कोरोना बाधितांवर उपचारासाठी सल्लाही घेण्यात आला.

malegao 3
photo: Scroll

या कोरोना विरुध्दच्या मोहिमेत कोव्हिड सोयीसुविधांनी युक्त अशा हाॅस्पिटलची तातडीनं गरज होती. प्रशासनाने यासाठी सरकारी रुग्णालयातील जवळपास २०० बेड कोव्हिड रूग्णांसाठी राखून ठेवण्यात आल्या. निवड केलेल्या खासगी रूग्णालयांतही विषाणूच्या उपचारासाठीची सर्व यंत्रणा उभी करून देण्यात आली. विशेष बाब म्हणजे शहर प्रशासनाकडूनही १२०० बेडची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली.

pune Corona care Center

राज्य सरकारच्या ‘मिशन मालेगाव’मध्ये पोलिस फौजफाटा सर्वात आघाडीवर पहायला मिळाला. पोलिसांनी दिवसरात्र एक करून परिस्थिती नियंत्रात आणण्याचा कसोशीनं प्रयत्न केला. यादरम्यान मात्र शेकडो पोलिसांना कोरोनाची लागण झाली. तीन पोलिस बांधवांचा कोरोनामुळं दुर्दैवी मृत्यूही झाला. या कठीण काळातही पोलिस प्रशासन नव्या जोमानं काम करू लागलं. एव्हाना आजही करताना पहायला मिळत आहे.

Corona 8

स्थलांतरीत नागरिकांच्या सोयीनुसार होम क्वारंटाईन करून घेणं, लोकांच्यात प्रबोधन करणं, स्वच्छतेविषयी जनजागृती करणं, औषधोपचाराची काळजी घेणं या सगळ्या बाबी प्रशासनानं व्यवस्थित हाताळल्या. एवढंच नव्हे तर खासगी सराव करत असलेल्या सर्व डाॅक्टरांना इतर आजारांच्या सुविधा देणंही बंधनकारक करण्यात आलं. या सगळ्यांचा परिणाम म्हणून ‘मिशन मालेगाव’ यशस्वी होत आहे.

Ujjain 12jpg

सरकारचं ‘मिशन मालेगाव’ आता कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर येऊन पोहचलंय. सध्याच्या घडीला कोरोना बाधीत रूग्णांचा आकडा ९० च्या खाली असला तरी, प्रशासनानं तसूभरही कमतरता सोडलेली नाही. याउलट कोरोना संक्रमणाचा धोका लक्षात घेता यंत्रणा आणखीनच सावध भूमिकेत आहे.

देशातील सर्वात दाटीवाटीच्या शहरात हा सकारात्मक बदल घडून येत असेल तर पुणे, मुंबई सारख्या शहरांनाही हे सहज शक्य आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा व नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘ही’ गोष्ट सर्वात धोकादायक, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला इशारा

-“धन्यवाद पवारसाहेब, आपण दिलेला शब्द पाळला…!”

-सुशांतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री रवीना टंडनचा बॉलिवूडबाबत मोठा खुलासा

-सुशांतबद्दल आता प्रेम व्यक्त करणाऱ्या कलाकारांवर सैफ संतापला, म्हणाला…

-शरद पवार-राजू शेट्टींच्या उपस्थितीत बारामतीत बैठक, घेतला ‘हा’ मोठा निर्णय