स्टेजवर नवरदेवानं उचललं धक्कादायक पाऊल, नवरीही झाली आऊट ॲाफ कंट्रोल, पाहा Video

लग्न समारंभामध्ये मजा मस्ती तर चालतेच. सर्वजण या क्षणाचा मनसोक्त आनंद लुटत असतात. अनेक गंमतीशीर किस्से लग्नांमध्ये घडत असतात. लग्न समारंभातील अनेक किस्से तर आयायुष्यभराच्या आठवणी बनून जातात.

लग्न म्हटलं की नवरा नवरीचे अनेक फोटोज काढले जातात. फोटोग्राफर या आनंदी क्षणाच्या आठवणी कॅमेरामध्ये कैद करून ठेवत असतो. मात्र, एका लग्नामध्ये फोटो काढणे फोटोग्राफरच्या चांगलंच अंगलट आलं आहे.

लग्नाच्या स्टेजवर फोटोग्राफरच्या वागण्याने हैराण झालेल्या नवरदेवाने त्याच्यासोबत असं काही केले की उपस्थितांसह नवरीला देखील हसणे कंट्रोल झालं नाही. ती स्टेजवरच मोठ मोठ्याने हसू लागली. काही लोकांनी हे सर्व कॅमेरामध्ये कैद केले आणि आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

रेणुका मोहन नावाच्या एका युजरने ट्विटरवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘आय जस्ट लव धिस ब्राईड’ असं कॅप्शन त्यांनी या व्हिडिओला पोस्ट करताना दिला आहे. अवघ्या काही तासांतच हा व्हिडिओ भरपूर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये फोटोग्राफर नवरीच्या हनुवटीला सारखा हात लावत तिला पोज देण्यास सांगत आहे. नवरदेव फोटोग्राफरचे हे सर्व वागणे बाजूला उभे राहून पाहत असतो. हे पाहून तो प्रचंड संतापतो आणि फोटोग्राफरच्या पाठीवर एक धपाटा देतो.

नवरदेवाचं हे वागणं पाहून नवरी जोरजोरात हसू लागली. मात्र, फोटोग्राफरला नेमकं काय झालं हे लक्षात येतंच नाही. फोटोग्राफर देखील मोठ मोठ्याने हसू लागतो. स्टेजवर चाललेलं हे दृश्य उपस्थित सर्वजण देखील हसू लागतात.

महत्वाच्या बातम्या –

पिल्लाचा जीव वाचवण्यासाठी मगरीच्या जबड्यात गेली आई, पाहा धक्कादायक व्हिडीओ

SBI च्या ग्राहकांना मोठा धक्का, अशाप्रकारे ATM वापरल्यास होणार दंड

या गावात आहे फक्त महिलांचंच राज्य, पुरुषांना गावात येण्यासही मनाई!

खजूर खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

अर्णव गोस्वमिंच्या अडचणीत वाढ! न्यायालयाने ‘या’ कारणाने गोस्वमिंविरोधात उचललं कठोर पाऊल